का चिडलेत एमपीएससीवाले?

Source : Google Image



गेल्या वर्षभरापासून आपण एका विचित्र परिस्थितीतून जात आहोत. कोरोनाच्या या संकटामुळे सामान्य लोक भरडले गेले आहेत. यातून स्पर्धा परीक्षेतून आपलं भविष्य घडवणारा विद्यार्थीवर्ग सुद्धा चुकला नाही. महाराष्ट्रातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या फारच कठीण होऊन बसल्या आहेत. 

या कोरोना संकटात एमपीएससी वाल्यांची परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली गेली. वरून त्यात वयोमर्यादेची अट घालण्यात आली.

एमपीएससीची परीक्षा ही एका दिवसाची नसते. ती पूर्ण वर्षभराची प्रक्रिया असते. आयोगाच्या एका परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जातात. 

पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थी मेहनत घेत असतात. वर्ष वर्षभर घरी जात नसतात. मात्र परीक्षाच लांबत असल्याने एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना कुठेतरी अडथळा निर्माण झालाय.

एमपीएससी पास झालेल्यांच्या नियुक्त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडल्या आहेत. 

मुलगी जर एमपीएससी करत असेल आणि तिथे काहीही कमी-जास्त झालं की तिच्या घरचे आधी लग्नाचं हत्यार बाहेर काढतात.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचं कारण देत परीक्षा पुढे ढकलली होती. तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत होता. तेव्हा नक्की कोणत्या कारणाने परीक्षा स्थगित केली हे कारण अद्यापही गुलदसत्यात आहे.

या सर्व कारणांमुळे एमपीएससी करणारा विद्यार्थी वर्ग सध्या फार मोठ्या तणावातून जात आहे. आयोगाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर यावरती तोडगा काढावा ही विनंती.

Post a Comment

1 Comments