कोरा कागज -

पोरांना जेवायला घालून त्यांना जबरदस्ती झोपवलं. आज खूप दिवसांनी मला प्यायची होती. कपाटातून बाटली काढली सोबत सगळा तामझाम घेऊन मी बसले. बसण्याआधी एकदा पोरांच्याकडे नजर टाकली खरंच त्यांना झोप लागली आहे की नाही बघितलं. दोघेही गाढ झोपेत आहेत याची खात्री पटली आणि मी बसले. चिकन सिक्स्टीफाय आणि सोबत रम. एकटीने पिण्यात काय मजा पण, असा विचार करत करत मी दोन पेग हाणले. आता डोळे जड झाले आणि आतून गुदगुल्या व्हायला लागल्या. खरं सांगू का... ह्या गुदगुल्या मला अजिबात सहन होत नाहीत. असलं काही हसू फुटतं की मला आवरता आवारत नाहीत. पण आता त्या आवरल्या शिवाय पर्याय नव्हता. मी हसत होते पण मोठमोठ्याने नाही गालातल्या गालात. डोळे अजून अजून जड होत जातील तस तस माझं मंद स्मित आणखी आणखी पसरत होतं. मध्येच मला काही तरी आठवू लागलं आणि आठवत आठवता चक्क दिसू पण लागलं. डोळे जड झालेच होते तरी पण जड झालेल्या पापण्या मी मुश्किलीने वर-खाली केल्या. समोर अजून अर्धा पेला भरलेला होता. उघड-झाप करत करतच मी पेला हातात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. पण हात पेल्यापर्यंत जायला किमान अर्धा मिनिट तरी लागलाच. शरीर असं स्लो मोशनवर येतं ना ...