Posts

कर्पूरगौरं करुणावतारं!

Image
“त्राही माम, त्राही माम,” करत राक्षसांच्या त्रासापासून बचावासाठी पळ काढणारे देवगण, हातात चिपळ्या घेऊन ‘नारायण, नारायण’ बोलणारे पण इकडचे तिकडे नि तिकडचे इकडे करून लावालावी करण्यातच धन्यता मानणारे नारदमुनी, शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले आणि देवी लक्ष्मीकडून सेवा करवून घेणारे भगवान विष्णू, कमळात विराजमान झालेले त्रिमुखी ब्रह्म, या सर्वांपेक्षा अंगाला भस्म फासलेला, विष प्यायल्याने नीलकंठ ठरलेला, गळ्यात साप आणि डोक्यावर गंगेचा भार वाहणारा, भोळा सांब सदाशिव मला जास्त प्रिय आहे. कृष्णाची राधा होण्याची कल्पना मला कधीच भावली नाही. पण, शिवाची पार्वती होण्याचा रोमँटिसिझम मला जास्त भावतो.   म्हणून माझा पहिला क्रश आहे तो महाशिव! सृष्टीचा तारणहार!   गुगलवरून साभार सांसारिक जीवनाचा पाया रचणारे शिव पार्वती हे पहिले दाम्पत्य मानले जाते. इतर देव आणि देव पत्न्या यांच्यापेक्षा शिव-पर्वतीची प्रेमकहाणी खूपच हटके आहे. शिवाचे सतीवरील प्रेम, तिच्या हट्टा पुढे विरघळणारे त्याचे कोमल हृदय आणि तिच्या विरहाने तापदग्ध झालेला तांडव करण्यास उद्युक्त झालेला शिव. शिवाची ही सगळी रूपे विलोभनीय वाटतात. ...

मी झाडावर उगवलो असतो तर!

Image
  त्या दिवशी मी प्रेमला सांगत होते, “बाहेर जाऊ नको खेळायला. ऊन आहे , झाडावर चढू नको पडशील , सारखं सारखं बाहेर राहू नये/खेळू नये, कोरोना आहे,” इत्यादी इत्यादी इत्यादी. माझी कॅसेट सुरू होती. ‘हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको.’ माझं हे बोलणं ऐकून तो वैतागला. तो रडत म्हणाला, “का जाऊ देत नाही मला बाहेर तू? मला खेळायचं आहे. मला कळतंय कशी काळजी घ्यायची स्वतःची. किती किरकिर लावते. तुला होण्यापेक्षा एखाद्या झाडावर उगवलो असतो, किती बरं झालं असतं.”   त्याच्या या वाक्यानंतर मला धक्का बसला. मी शांत बसले. तो जेवायला लागला. त्याचं जेवण होईपर्यंत मी त्याला काहीही बोलले नाही आणि जेवण केल्यानंतरही नाही. त्या क्षणी माझ्यासमोर फक्त चांदण्या नाचत होत्या. माझ्या लेकानेच मला दिवसा चांदण्या दाखवल्या होत्या. आता या वेळी माझ्याजवळ दोन पर्याय होते. एक मी स्वतःला भावनिक त्रास करून घ्यावा, माझा मुलगा असं कसं बोलू शकतो? त्याला माझा वीट कसा येऊ शकतो? माझी काळजी त्याला कळत कशी नाही?, वगैरे वगैरे वगैरे. किंवा मी घडल्या प्रकाराची दुसरी बाजू बघण्यासाठी स्वतःला वेळ देऊ शकत होते. पहिलं मी स्वतःला ...

सर्टिफिकेट!

Image
  मुलीने कसं संस्कारी असलं पाहिजे. मोठ्याने बोलू नये, हसू नये, खिदाळू नये, प्रश्न विचारू नये, नको त्या गोष्टीत डोकं लावू नये, खाजगी भागावर मुकाट्याने टाके घालून घ्यावेत का तर उद्दीपन होऊ नये. मित्रांच्यात मिसळू नये, का तर अशीतशी मुलगी समजतील, रात्रीचे, नव्हे नव्हे; संध्याकाळी सात नंतर घरात कसे येता येईल ते पाहावे, घरचे म्हणतील त्याच्या गळ्यात माळ घालावी आणि पुढे तो म्हणेल तसे वागावे. मग त्याने भलेही तू जीव दे आणि जीव देण्यापूर्वी तुझा व्हिडीओ बनवून मला पाठव (का तर खात्रीसाठी. खरेच तू मेली का?) असे म्हटले की काय करावे? तिने स्वतःचा विचार करावा, आई-वडिलांचा विचार करावा आपल्या आयुष्याचा विचार करावा. थू तुमच्या **डीवर. हो शिवी येते. कारण, तुम्ही तिला मशीन समजता. तुम्हाला हवे तेंव्हा तिने मृदू व्हावे आणि तुम्हाला हवे तेंव्हा कठीण. वा रे दुनिया. एक तर तुम्ही तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होऊ देणार नाही. सतत संस्कार, परंपरा करत तिच्या मर्यादा दाखवत राहणार आणि म्हणे वेळ आली की तिने खंबीर बनले पाहिजे. एका दिवसात माणसाच्या मनाचा पोत बदलतो? एका क्षणात मेणाचे लोखंड करण्याची किमया तर खुद्द प...

आज राष्ट्रीय विज्ञान दिवस!

Image
  दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. यावर्षी देखील आजच्या दिवसात देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा होत आहे. भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सी. व्ही. रमन यांनी भौतिकशास्त्रात लावलेल्या रमन इफेक्टच्या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिकाने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा भौतिक शास्त्रातील या अतुलनीय योगदानासाठी १९३० मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. विज्ञान क्षेत्रातील नोबेल मिळवणारे सी. व्ही. रमन हे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत. जेव्हा प्रकाश किरण कोणत्याही पारदर्शक वस्तू मधून (स्थायू, द्रव, वायू) आरपार जातात तेव्हा काही परावर्तीत प्रकाश किरणांची तरंगलांबी आणि त्यांचे आकारमान ( amplitude) बदलते. ज्या माध्यमातून हे प्रकाश किरण परावर्तीत होतात त्या माध्यमातील अणूमुळे या प्रकाश किरणातील उर्जा कण जास्त प्रमाणात पसरतात. हाच तो सिद्धांत ज्याला विज्ञानात रमन इफेक्ट (रमन प्रभाव) म्हटले गेले. सी. व्ही. रमन यांनी आजच्याचदव दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी १९२८ रोजी हा...

कोरा कागज भाग-६

Image
  सरला काकू घराजवळ कधी पोहोचल्या हे त्यांचं त्यांना पण कळलं नाही. विचारांच्या तंद्रीत त्या चालतच राहिल्या. रस्ता कधी मागं गेला याचा त्यांना पत्ताही लागला नाही. घराजवळ येताच त्यांना दुरूनच काहीतरी बिघडल्याची जाणीव झाली. जाताना होतं तसं आत्ता का दिसत नाही? हा एक नवा विचार आता त्या घोळवू लागल्या. या विचाराचा धागा पकडून त्या जसजशा घराजवळ येत गेल्या तसतसं त्यांना कळालं की बहुतेक सुदीपनी काही तरी पराक्रम केला असेल किंवा सुषमाने काही तरी आगाऊपणा केला असेल त्याशिवाय इतकं पाणी रस्त्यावर येणार नाही आणि बारीक काळीराख पण उडाली होती सगळीकडे म्हणजे नक्कीच काही तरी मोठा तमाशा करून ठेवला असेल या बाईनं. एका मागून एक येणाऱ्या या असंबंध विचारांनी त्यांचे मन अस्वस्थ होत होते. दारात आल्यावर तर घरात पसरलेली शांतता त्यांना आणखीनच त्रस्त करून गेली. त्या घरात आल्या तर सुषमा आणि सुदीप खाली मान घालून बसले होते. त्यांनी दळपाचा डबा ठेवला आणि इकडे तिकडे बघू लागल्या. सुषमाने भाजीची तयारी तर सगळी करून ठेवली होती. संध्याकाळचे सात वाजायला आहे होते. त्यांना पुढच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. बाहेर ठेवलेल्या बदलीकडे त...

कोरा कागज भाग-५

Image
  एकतर सासूच्या आजारपणामुळं दिवसभर दगदग झालेली. त्यात ही चकलीची फर्माईश. आईला एवढं जीवावरचं दुखणं आलंय त्याचं लेकाला काही नाही आणि सुनेला मात्र डोस पाजायला सगळे तत्पर. अगदी आयुष्यभर एकमेकींच्या इर्ष्येवर संसार करणाऱ्या जावा पण म्हातारपणात मात्र सुनेच्या बाबतीत वागताना अगदी एक होतात. सासूला जरा आराम वाटायला लागल्यावर तिनं ही सगळी भाजणीची तयारी केली आणि लागलीच दळण घेऊन आली. आज दळण झालं तर उद्या किंवा जमल्यास रात्रीच्या जेवणानंतर लगेचच चकल्या करता आल्या असत्या. उद्याचं सुद्धा काम आज आत्ता कसं होईल याकडेच तिचं लक्ष. कधी तरी निवांत वेळ मिळेल म्हणून बिचारी होता होतील तेवढी कामं हाताबरोबर करण्याचा प्रयत्न करायची. पण, कसलं काय घरातलं काम म्हणजे हनुमानाची शेपटीच करेल तितकी वाढती पण कमी व्हायचं नाव घेत नाही. इथं आल्यावर जरा कुणाशी काय बोलणं सुरु करावं म्हंटलं तर त्यात पण, खोट. शेवंता काकू मघापासून गप्प होत्या आणि अचानकच सुरु झाल्या, “काय उपेग नाही बगा भाड्यास्नी मोठं करून. तुम्हाला सांगतो, नुसतं बायको म्होरं गोंडा घोळत्यात. ” त्यांच्या डोळ्यात उद्वेग होता जणू एकीकडे लेकाला शिव्या तर घ...

कोरा कागज भाग -४

Image
  दारातल्या बॅरेल मधल्या मगानं ती त्या आगीवर पाणी फेकू लागली. शेजारच्या सरू काकू त्यांच्या गॅलरीतून हे पाहत होत्याच. नाही तरी सुषमावर लक्ष ठेवणं हे एक त्यांचं अलिखित कर्तव्य होतं. पाणी मारता मारता तिचं तोंड पण सुरु होतंच. एकतर आधीच सकाळपास्नं घरात दंगा सुरु हाय. त्यात आता तू हे करून ठेवलास. आता काय करायचं. बघ, हे तेंच नव शर्ट जळलं. सुषमाने कशीबशी ती आग विझवली आणि आधी सुदीपला जवळ ओढून घेतलं. तिचं पूर्ण अंग कापत होतं. सुदीप पण घाबरलेला त्याला वाटलं होतं आता मम्मी मारेल. पण, तिने जवळ ओढल्यामुळे तो थोडासा तिच्या बाबत आश्वस्त झाला होता. पण, पुढच्याच क्षणी त्याला पप्पांचा चेहरा आठवला. आता हे पप्पांना कळालं तरी आपल्या दोघांचीही खैर नाही हे त्याला कळून चुकलं होतं. सुदीप शांत झालाय हे लक्षात आल्यावर सुषमाने सगळा कठडा धुवून काढला. कपडे सगळे काढले आणि एका बादलीत टाकले. सगळेच थोडेफार तरी जळालेच होते. आधीच सासूचा सकाळचा बिघडलेला अवतार आणि त्यात आता सुदीपचा हा पराक्रम. तिला फक्त एवढंच कळत होतं की आजचा दिवस काही बरा नाही. पण, तरीही तिने फार धसका वगैरे घेतला नाही. कारण, खराब दिवस कधी अचानक उगव...