मग करावं तरी काय आता?

छे एकटं वाटतंय...! कुणाला फोन करावा का छान गप्पा होतील? किंवा कुणाला तरी मेसेज? अगं सणावाराचं लोकं बिझी असतात त्यांच्या त्यांच्या कामात. सणाची तयारी करायची. पुन्हा ते एन्जॉय करायचं मग छान छान फोटो घ्यायचे त्यावर छान छान पोस्ट लिहायची. गप्प तू कुणालाही डिस्टर्ब नको करू. पलीकडून त्रासिक आवाज आला की पुन्हा तू नाराज होशील. मेसेज करू का कुणाला? अगं सकाळीच बघतीलं ना कसं झालं. तू त्याला सहज विचारलंस, काय झालं रे? मग तो म्हणाला तू गप्प बसत जा. हे बघ लोकं गप्प बसवतात तर मेसेज करून काही उपयोग आहे का त्यांना? त्यांना वेळ मिळाला की करतील ते फोन किंवा मेसेज. तू स्वतःहून काही करायला नको जाऊ कुणाला. आणि काय तो सारखा सारखा फोन आणि मेसेज दुसरी काही कामंच नाहीत का? हम्म. काय करू शकते मी दुसरं.... दुसरं... दुसरं....? पोटात कालवल्या सारखं पण होतंय... थोडं खाल्लं तर बरं वाटेल नाही? अगं किती खाशील? वजन किती वाढलंय? आणि काय करणार काय तू आता? अशा भलत्या वेळी? पुन्हा कुणी संपवलं नाही तर. शिल्लक राहील. पुन्हा टाकून द्यायचं होत नाही म्हणून तुलाच ते शिळं खावं लागेल. पुन्हा अॅसिडिटी वाढेल. त्यापेक्षा स...