सामान्य, कष्टकऱ्यांचे नेते भाई भरत पाटील...!

 


 
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील म्हणजे पुरोगामी ,परिवर्तनवादी चळवळीतील एक महत्वाचं नाव.भाऊंचे वडील रंगराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक आणि शाहूवाडीचे पहिले आमदार. भाई माधवराव बागल यांच्या वैचारिक मुशीतून तयार झालेले रंगराव  पाटील म्हणजे जनसामान्यांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडणारा जनतेचा आमदार. भाई रंगराव पाटील यांचा हा वारसा समर्थपणे चालविण्याचे काम भारतभाऊंनी केले. शेतकरी,कष्टकरी ,कामगार आणि दलित, शोषितांच्या न्याय हक्कासाठी भारत भाऊंनी आजपर्यंत अविरतपणे संघर्ष केलेला आहे. अन्यायाच्या विरोधात लढणारा नेता अशी भाऊंची प्रतिमा! ही प्रतिमा काही एका रात्रीत तयार झालेली नाही त्यासाठी आयुष्यभर भाऊंनी संघर्ष केला, अनेक प्रस्थापित शत्रूंना अंगावर घेतले, स्वतःचा जीव धोक्यात घातला पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला तेव्हा गरीबांचा शोषितांचा बुलंद आवाज म्हणून भाऊ सुपरहिट झाले.  परिवर्तनवादी चळवळींनी दुहीचा अहंकाराचा शाप आहे. परंतु भाऊ या सगळ्याच्या पलिकडे गेले आहेत. आपल्या समविचारी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे  उभे राहणारे भाऊ नव्या पिढीशी नेहमी संवाद करतात. भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणणारे भाऊ शोषितांच्या न्यायासाठी जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्यांचा त्या प्रश्नातला अभ्यास,सर्वांना

न्याय हक्कासाठी भारत भाऊंनी आजपर्यंत अविरतपणे संघर्ष केलेला आहे अन्यायाच्या विरोधात लढणारा नेता अशी भाऊंची प्रतिमा ही प्रतिमा काही एका रात्रीत तयार झालेली नाही त्यासाठी आयुष्यभर भाऊंनी संघर्ष केला अनेक प्रस्थापित शत्रूंना अंगावर घेतले स्वतःचा जीव धोक्यात घातला पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या तरुण भोगला तेव्हा गरीबांचा शोषितांचा बुलंद आवाज म्हणून भाऊ सुपरहिट झालेली आहे. परिवर्तनवादी चळवळींनी दुहीचा अहंकाराचा शाप आहे. परंतु भाऊ या सगळ्याच्या पलिकडे गेले आहेत.आपल्या समविचारी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे  उभे राहणारे भाऊ नव्या पिढीशी नेहमी संवाद करतात.भ्रष्ट अधिकार्यांना वठणीवर आणणारे भाऊ शोषितांच्या न्यायासाठी जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्यांचा त्या प्रश्नातला अभ्यास, सर्वांना सोबत घेण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची संघर्षशील वृत्ती या गोष्टी दिसून येतात. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंनी अनेक लोकलढे यशस्वी केले. धरणग्रस्तांच्या चळवळीत असणारे भाऊंचे योगदान विसरता येणार नाही. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेला संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीत चळवळींची होणारी पिछेहाट हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे प्रखर आत्मटीकेतून यावर मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी तरुण पिढीला चळवळीशी जोडून घेण्याची आवश्यकता भाऊ प्रतिपादीत करतात. चार दशकांहून अधिक काळ चळवळीत सक्रीय राहणं ही साधी गोष्ट नाही. घरचं खाऊन टीका झेलायची ,खचून न जाता सतत लढत रहायचं,कोणतीही साधनं नसताना लढाई जारी ठेवायची हे फार कष्टप्रद आहे. भाऊंनी ते करुन दाखवलंय. चळवळीसाठी केलेला त्याग आणि समर्पण समजून घ्यायचं असेल तर भाऊंच्या पिढीकडं पहावं लागेल. भाऊ त्या पिढीचे प्रतिनिधी आहेत की ज्या पिढीने 'स्व' पेक्षा 'समुहाच्या'उत्थानाला प्राधान्य दिले. साऱ्या अमिषांना ठोकर मारत ते तत्वाशी एकनिष्ठ राहीले. कोणत्याही मोहाला बळी पडले नाहीत.

बळीराजाचा बळी घेऊ पाहणाऱ्या व्यवस्थेला आव्हान देत राहिले. संघटनेचं बळ वाढवित राहिले. त्यांनी शेकापच्यावतीनं निवडणुका लढवल्या.पराभव समोर दिसतोय पण विचार टिकवण्यासाठी हा माणूस प्रस्थापितांशी लढत राहिला. लाईटबिल कमी करवून घ्यायचं तर भाऊ पाहिजेत, न्याय मिळवण्यासाठी भाऊ पाहिजेत आणि मतं द्यायला मात्र प्रस्थापित उमेदवार पाहिजेत. हे वास्तव बघितल्यावर मनाला खंत वाटतेच. साठी पार केल्यावरही भाऊ थकलेले नाहीत. उलट व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत अधिक उत्साहानं सक्रिय आहेत. शोषणवादी नव्या प्रारुपात रुजत असताना भाऊ लढाई न थांबवता ती गतीमान करण्यासाठी धडपडतायत. शेतकरी कायदे आणि नवे शैक्षणिक धोरण कसे जनतेच्या मुळावर उठणार आहे ते सांगतायत.फॕसिझमपासून सावध राहण्यासाठी तरुणांचं प्रबोधन करतायत.भाऊंच्यासारखी लढणारी माणसं आहेत म्हणून म्हणून जनतेला न्याय मिळतोय.लढणाऱ्या माणसांची संख्या वाढविणं, हाच त्यांच्या वाढदिवसाचा अर्थपूर्ण संकल्प ठरु शकतो. परिवर्तनाच्या चळवळीतील या लढाऊ नेत्याला मनःपूर्वक शुभेच्छा !!


©® मेघश्री श्रेष्ठी


Post a Comment

0 Comments