अक्षर मानव - संवाद सहवास ७ (मा. कुमार केतकर)

अक्षर मानव - संवाद सहवास ७ (मा. कुमार केतकर) अक्षर मानवच्या प्रत्येक संवाद सहवासातून काही न काही अक्षर ज्ञान मिळतच. म्हणूनच या कार्यक्रमासाठी आपणही जावं, अशी अक्षरशः आग लागतेच. त्यात अगदी घरच्यासारखच संयोजन, तशीच माणसं, जीव लावणारी, म्हणून सोबत मुलांनाही घेतलं तरी काही वावगं किंवा गैरसोयीचं वाटत नाही. या सगळ्या अक्षर मानवांना भेटण्याची अतीव ओढही असतेच. आ. ह. साळुंखे ते कुमार केतकर असे एकूण सात संवाद सहवास अक्षर मानवने आयोजित केले. कुमार केतकरांसोबतचा सातवा संवाद सहवास नुकताच सातार्याला पार पडला. केतकर सरांनी, ते पाकिस्तानात गेले असतानाच्या काही आठवणी सांगितल्या. त्यातला एक किस्सा ऐकून माझे डोळे अक्षरशः पाणावले. ते पाकिस्तानच्या दौर्यावर गेले असताना, तिथल्या असेम्बलीतील काही खासदार आमदारांना त्यांनी विचारलं की, "इथल्या सामान्य माणसांच भारताबद्दल काय मत आहे?" तर ते त्याच्या कडे पाहताच राहिले आणि त्यांनी अस उत्तर दिलं की, "काही नाही! त्यांचं काय मत असणार भारताबद्दल? त्यांना एवढा विचार करायला कुठे वेळ आह...