स्पर्श

असा झुरळासारखा रेंगाळणारा,
ओंगळवाणा स्पर्शाचा अनुभव देऊ नकोस.
जमलच तर बघ,
गालावर ओठ रुतवून,
जमिनीवर टेकलेल्या पायांवर,
शरिराला समभागात,
दुभंगून,
रुतणारा एक सरळ,
छेद देता येतो का?
जिथे तुझ्यामाझ्या समरुपतेला,
आसमंतही निर्धोकपणे सामावून घेईल.
© मेघश्री श्रेष्ठी. ‌

Post a Comment

2 Comments

बेभान , अफाट शब्द लागू होतात या लिखाणाला..शुभेच्छा
Ravi Dhaware said…
तुफान❤️👌