नकारात्मक विचारांना सकारात्मक दिशा देता येते./Flip negative thoughts into positivity!
दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येत असतात. यातील कित्येक विचार हे नकारार्थी आणि आपल्याला मागे खेचणारे असतात. ‘वैरी न चिंती ते मन चिंती,’ असं उगीच म्हटलेलं नाही. आपल्याबद्दल ते आपल्या वैऱ्याच्याही मनात कधी येणार नाही ते आपल्या मनात आधीच येऊन गेलेलं असतं. ‘रिकामं मन सैतानाचं घर,’ अशीही म्हण आपल्याकडे रूढ आहेच. या सगळ्या म्हणीतून हेच सांगायचं आहे की, मनातील विचारांकडे आपले लक्ष असेल तर आपल्या कितीतरी चिंता निर्माण होण्याआधीच दूर होतात. आता प्रसादचंच उदाहरण घ्या. गाडी चालवायला शिकून त्याला आत्ता जवळपास दहा वर्षे तरी होत आली. अनेकदा त्याने दिवसरात्र प्रवास करून लांबचे अंतर कमी वेळेत पार केलेले आहे. पण, त्यादिवशी घरातून पार्टीला जाताना मध्येच त्याच्या मनात विचार आला, आपण इतकी फास्ट गाडी चालवतो पण, कधी कुठे अपघात झाला तर काय करणार? झालं या एका विचारातून त्याच्या मनात पुढे नकारात्मक विचारांची मालिकाच तयार झाली आणि अपघाताच्या नुसत्या कल्पनेनेच त्याला दरदरून घाम फुटला. खरं तशाही अवस्थेत तो गाडी चालवत होताच पण नुसत्या कल्पनेने त्याला हतबल करून सोडले. पण, अपघाताचा विचार त्याच्या मनात आला ...