Posts

Showing posts from December, 2020

मग करावं तरी काय आता?

Image
छे एकटं वाटतंय...! कुणाला फोन करावा का छान गप्पा होतील? किंवा कुणाला तरी मेसेज? अगं सणावाराचं लोकं बिझी असतात त्यांच्या त्यांच्या कामात. सणाची तयारी करायची. पुन्हा ते एन्जॉय करायचं मग छान छान फोटो घ्यायचे त्यावर छान छान पोस्ट लिहायची. गप्प तू कुणालाही डिस्टर्ब नको करू. पलीकडून त्रासिक आवाज आला की पुन्हा तू नाराज होशील. मेसेज करू का कुणाला? अगं सकाळीच बघतीलं ना कसं झालं. तू त्याला सहज विचारलंस, काय झालं रे? मग तो म्हणाला तू गप्प बसत जा. हे बघ लोकं गप्प बसवतात तर मेसेज करून काही उपयोग आहे का त्यांना? त्यांना वेळ मिळाला की करतील ते फोन किंवा मेसेज. तू स्वतःहून काही करायला नको जाऊ कुणाला. आणि काय तो सारखा सारखा फोन आणि मेसेज दुसरी काही कामंच नाहीत का? हम्म. काय करू शकते मी दुसरं.... दुसरं... दुसरं....? पोटात कालवल्या सारखं पण होतंय... थोडं खाल्लं तर बरं वाटेल नाही? अगं किती खाशील? वजन किती वाढलंय? आणि काय करणार काय तू आता? अशा भलत्या वेळी? पुन्हा कुणी संपवलं नाही तर. शिल्लक राहील. पुन्हा टाकून द्यायचं होत नाही म्हणून तुलाच ते शिळं खावं लागेल. पुन्हा अॅसिडिटी वाढेल. त्यापेक्षा स...

कोरा कागज भाग-३

Image
  “तू ऐकलं असशील कदी तर तो ऐकल. नाही तर त्याचं काय नडलंय ऐकायला? कधी कधी म्हणून माया-लेकरांना माझी किंमत केली नाही. कायम मला आपलं वाळीत टाकल्यावाणी वागवत्यात.” बोलता बोलता त्यांचा आवाज कापरा झाला आणि डोळं पाण्यानं डबडबलं. सुषमा पुरतीच गोंधळून गेली. आत्ता तरी आपणहून भाकरीला बसली होती. ही भाकरीला बसली म्हणून मी कपडे-भांडी आवरलं. मग आता अचानकच हिला काय झालं? सुदीप भांबावल्या नजरेनं एकदा आईकडं आणि एकदा आज्जीकडं बघू लागला. गांगरून उभारलेला सुदीप, अस्वस्थ झाला होता, हात पाठीमागे बांधून, भिंतीला पाठ टेकवून तो आपल्या एकच पाय हळूहळू वर आणि हळूहळू खाली आणत तसाच उभा होता. सरला काकूचा आवाज काही शांत होण्याचं नाव घेत नव्हता. त्यात आवाज इतका   मोठा की गल्लीला ऐकू जाईल. सुदीप पण चक्रावला. अचानक आज्जीला काय झालं? तो आपल्या शांत आवाजात म्हणाला, “आगं, टीव्ही सुरु होता. मला तुझा आवाज आला नाही. मी कार्टून बघत   होतो, ते सोडून मला येऊ वाटलं नाही. लगेच रडायला काय झालं तुला?” तो एवढंच बोलला, आणि सरला काकूंचं मस्तक आणखीच फिरलं. “व्हय, व्हय, लगेच वड लगली बघ तुला आईची. कसा बाजू घेतो आईची. एव...

सामान्य, कष्टकऱ्यांचे नेते भाई भरत पाटील...!

Image
    शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील म्हणजे पुरोगामी ,परिवर्तनवादी चळवळीतील एक महत्वाचं नाव.भाऊंचे वडील रंगराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक आणि शाहूवाडीचे पहिले आमदार. भाई माधवराव बागल यांच्या वैचारिक मुशीतून तयार झालेले रंगराव  पाटील म्हणजे जनसामान्यांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडणारा जनतेचा आमदार. भाई रंगराव पाटील यांचा हा वारसा समर्थपणे चालविण्याचे काम भारतभाऊंनी केले. शेतकरी,कष्टकरी ,कामगार आणि दलित, शोषितांच्या न्याय हक्कासाठी भारत भाऊंनी आजपर्यंत अविरतपणे संघर्ष केलेला आहे. अन्यायाच्या विरोधात लढणारा नेता अशी भाऊंची प्रतिमा! ही प्रतिमा काही एका रात्रीत तयार झालेली नाही त्यासाठी आयुष्यभर भाऊंनी संघर्ष केला, अनेक प्रस्थापित शत्रूंना अंगावर घेतले, स्वतःचा जीव धोक्यात घातला पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला तेव्हा गरीबांचा शोषितांचा बुलंद आवाज म्हणून भाऊ सुपरहिट झाले.  परिवर्तनवादी चळवळींनी दुहीचा अहंकाराचा शाप आहे. परंतु भाऊ या सगळ्याच्या पलिकडे गेले आहेत. आपल्या समविचारी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे  उभे राहणारे भाऊ नव्या पिढीशी ...

शाश्वत विकासासाठी मानवी एकता!

Image
    आज आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणजेच I nternational Human Solidarity Day . दर वर्षी २० डिसेंबर रोजी हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. जगभरातील विविध देश, त्यांची वेगवेगळी संस्कृती, खानपान, भाषा, वेशभूषा अशा कितीतरी गोष्टीत संपूर्ण मानव जात विभागली गेली आहे. पण, या संपूर्ण मानव जतीला एकत्रित बांधून ठेवणारा घटक म्हणजे आपले ‘माणूसपण.’ भारताचंच उदाहरण घेतले तर इथे अनेक गोष्टींत विविधता आढळते. तरीही अगदी प्राचीन काळापासून या विविधतेला एकत्रित बांधणारी एकताही इथे आहे. जगाचा विचार केला तर ही विविधता आणखी भव्य वाटू लागते. पण, जगभर विखुरलेल्या या मानवी समूहालाही एक एकत्रित बांधणारी गोष्ट म्हणजे माणुसकी. अगदी आपण हजारो किमी दूर अंतरावर राहणारे, अपरिचित जीव असलो तरी आपल्या जगण्याचे ताणेबाणे कसे एकत्र गुंफलेले आहेत हे आपण याच वर्षी पहिले. एका देशात कोरोनाचा उदय झाला पण,   बघता बघता या छोट्याशा व्हायरसने संपूर्ण जग पादाक्रांत केले. एका देशाच्या अनुभवावरून दुसरे देश शहाणे होत गेले. संपूर्ण मानवजातीवर ओढवलेले हे संकट निवारण्यासाठी डब्ल्यूएचओ सारख्या जागतिक संघटनेनेही कंब...

कोरा कागज भाग -२

Image
  दहावी झाली आणि हातात चुडा भरला. तोपर्यंत टीव्हीतील हिंदी पिक्चरातील हिरो-होरोईनचं प्रेम म्हणजे संसारच असा तिचा समज होता. पण, तीला कधीच नवरा कुठे बागेत फिरायला घेऊन जात नव्हता. दोघांनी कधी हॉटेलात जाऊन एका ग्लासात दोन स्ट्रॉ टाकून ज्यूस प्यायला नव्हता. कधी दोघांनी एकमेकांना खेटून बागेतल्या बाकावर बसण्याचा आनंद घेतला नव्हता. हातात हात घालून एकमेकांच्या श्वासात हरवल्याचा अनुभव घेतला नव्हता. अनुभव होता तो फक्त एखाद्या शारीरिक कसरती प्रमाणे होणाऱ्या दोन देहांच्या झटापटीचा. महिन्या पंधरा दिवसातून घरी येणाऱ्या सुधीरला बायकोच्या देहाची गरज मात्र होती. पण, तिच्या भावनांची कदर करण्या इतपत वेळ अजिबात नव्हता. शिवाय, दहावी शिकलेली अडाणी बायको. कुठे चार चौघात नेली तर आपलीच मान खाली. काय सांगणार आणि कसं सांगणार आपली बायको अशी एकमद काकू बाई टाइप आहे म्हणून! दहावी हे शिक्षण फक्त सांगण्या पुरतंच झालं होतं. नाही तर शिकल्या सवरल्या मुलीसारखा गुड लुकिंग चार्म कुठे होता तिच्यात? मग, त्यालाच मान खाली घालावी लागणार नाही का? सरला काकूला सुषमाची होणारी घालमेल कळत नव्हती असे नाही. पण, जाणूनबुजून डोळ्या...

सांगलीची द्राक्षे आता चालली थेट अमेरिकेच्या बाजारपेठेत

Image
 मातीतून सोनं उगवण्यची किमया साधायची असेल तर पाण्यासारखा घाम गाळण्याची आणि कष्टाला कल्पकता, आधुनिकता आणि व्यवहाराचीही जोड द्यावी लागते. आपल्या सांगलीतील काही शेतकऱ्यांनी अशीच आपल्या जिद्दीतून ही किमया साधली आहे, वाचा त्यांच्या जिद्दीची गोष्ट सुधीर नलवडे यांच्या लेखणीतून! हापूस आंबा हा प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवरील भागात पिकतो. पण खाण्यासाठी  "देवगड" हापूस आंब्याला जगभरात जी मागणी आहे. त्यासारखी मागणी इतर भागात पिकणाऱ्या हापूस आंब्याला नक्कीच नाही. जगभरातील आंब्याचा "राजा" म्हणून देवगडचा हापूस आंबा जगमान्य आहे.  फोटो सौजन्य सुधीर नलवडे याच प्रमाणे सांगली जिल्ह्यात पूर्व भागात प्रामुख्याने तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज,  खानापूर आणि पलूस व जत तालुक्यातील काही भागात मोठया प्रमाणात द्राक्षे व द्राक्षेपासून 'मनुका (बेदाणा)' चे उत्पन्न घेतले जाते. आर्थिक उलाढाल असलेली एक मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. या भागात पिकणारी 'द्राक्षे व मनुका' खाण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. देशासह जगभरातील अनेक भागात 'द्राक्षे व मनुका (बेदाणा)' चा पुरवठा या भागातून केला ज...

कोरा कागज भाग-1

Image
  भाग १ -  सकाळी उठून तिने बंब पेटवला. पाणी गरम होईपर्यंत अंगण आणि घर झाडून काढले. अंघोळ केली. गॅसवर चहा ठेवला. चहा घेऊन देवपूजा केली. रात्रीची भांडी घासण्यासाठी अंगणात नेली.   तीच्ची भांडी होईपर्यंत, तो उठला त्याने स्वतःचे आवरायला सुरुवात केली. तिने त्याच्यासाठी चहा ठेवला. अंघोळ आटोपून तो बाहेर आला. मग सुदीप उठला त्याची आवरायची आणि अंघोळीची गडबड. सगळ्यांचे आवरल्यावर तिने नाश्ता केला. सुदीप तिसरीत होता. पण, शांत होता. काहीही काम करताना गडबड गोंधळ अशी त्याची सवय नव्हती. शिवाय, पप्पाचा प्रचंड धाक! इतका की सुदीपला पप्पाने हाक मारली तरी, तो ततपप करू लागे. कधी-कधी सुधीरला वेळ असेलच तर चुकून त्यांच्यात थोड्याफार गप्पा होत असत. पण, त्याला कामानिमित्त नेहमी बाहेर राहावे लागे त्यामुळे दोघांच्यात फारसा संवाद होत नव्हता. त्यात सुषमाने सतत त्याला पप्पा रागावतील, पप्पा रागावतील अशी भीती घालून त्याच्या मनात सुधीर विषयी एक अनामिक दडपण निर्माण केले होते. तिची तर काय चूक! सुदीप तिचे म्हणणे अजिबात ऐकत नव्हता. तिने काही सांगितलेच, “हां, तुला काय कळतंय? लई शाणी हाइस,” असे बोलून तिचे म्हणणे उ...