Posts

निराश मानसिकता असणाऱ्या जोडीदाराशी कसं जुळवून घ्यायचं?

Image
असं म्हणतात की , लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण बरेचदा नवरा-बायकोचा स्वभाव हा नेमका उलटा निघतो असं का बरं ? हा प्रश्न तर अनेकांना सतावत असेल. पती-पत्नीच्या स्वभावात अंतर का असतं ? याचं उत्तर तर काही देता येणार नाही, पण स्वभाव वेगळे असले तरी , एकमेकांसोबत adjust कसं करायचं हे मात्र आम्ही सांगू शकतो. जोडीदार जर नकारात्मक आणि निरुत्साही असेल तर , अशा जोडीदाराशी कसं पटवून घ्यायचं ? काही लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असतो, तर काही लोकं नेहमीच निराश मानसिक अवस्थेत असतात. अशा लोकांसोबत राहताना , अनेकदा उत्साही, आनंदी व्यक्तीची घुसमट होऊ शकते. कारण , अर्थातच स्वभाव भिन्नता! असं असलं तरी , काही छोट्या-छोट्या युक्त्या वापरून तुम्ही आनंदी राहू शकता आणि जोडीदारालाही समजून घेऊ शकता. जोडीदार नकारात्मक किंवा निराश मानसिकतेत जगणारा आहे , म्हणून तुम्हीही तोच दृष्टीकोन स्वीकारू नका. स्वतःच्या गरजा , स्वतःचा आनंद यासाठी जोडीदारावर अवलंबून राहणे सोडा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ द्या. तुमचा आहार , शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे , ही जबाबदारी तु...

दोन दिसांची नाती

Image
आयुष्यात अनेक प्रकारच्या नात्यांनी आपण जखडलेले असतो. मनुष्य जन्म घेण्यापूर्वीच त्याची नाती जन्माला येतात. बाळ जन्म घेण्यापूर्वीच त्याचं प्रत्येक व्यक्तीशी असणारं नातं जन्म घेतं. आजी-आजोबा आतुरतेनं आपल्या नातवाची वाट पाहत असतात. त्याला खेळवण्याची , त्याच्याशी बोबडे बोल बोलण्याची अतूट इच्छा तीव्र झालेली असते ; आणि एका नव्या जगात प्रवेश करत ते बाळ आपल्या ठरलेल्या भूमिका वठवायला आलेलं असतं. कुणाचा नातू म्हणून , कुणाचा मुलगा म्हणून ; तर कुणाचा भाचा , पुतण्या म्हणून. ही नाती रक्ताची असतात , प्रेमाची असतात , विश्वास मैत्री आणि स्नेहपूर्ण असतात. विश्वासाच्या रेशीमधाग्यांनी घट्ट बांधलेली असतात. दिन जीवांचा स्नेह एकमेकांशी विश्वासाने बांधला जातो. असा स्नेहबंध म्हणजे नाती. रक्ताच्या नात्याप्रमाणे काही मानलेली नाती असतात. मनानं जुळलेली , जवळ आणणारी ही नाती आयुष्यात खूप वेळा जोडण्याची संधी आपल्याला मिळत राहते; पण ती टिकवणं, योग्य जबाबदारीनंनिभावून नेणं खूप अवघड असतं. मैत्री , प्रेम , विश्वास , आस्था , सहानुभूती यांनी ओतप्रोत भरलेली नाती कधी संपत नसतात ; आणि संपलीच तर त्यासारखी दुर...

नैराश्यातही रोजची कामं उरकण्यासाठी काय आयडिया वापरता येतील? तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का?

Image
घर आवरायचं आहे, कपडे धुवायचे आहेत , परवा धुवून आणून ठेवलेले कपडे अजून घडी घालायचे आहे, स्वयंपाकाची तयारी करायची आहे, बाजारातून भाजी पण आणली नाही अजून... डोक्यात कामांची नुसती यादी सुरु असते पण एकाही कामाला हात लावू वाटत नाही. अगदी जे काम केल्याशिवाय पर्यायच नाही अशी कामं तेवढी कशीबशी उरकली जातात. ती करताना पूर्वीचा उत्साह जाणवत नाही. विनाकारण थकल्यासारखं वाटतं. स्वयंपाकात जिथे पूर्वी दोन भाज्या बनत होत्या तिथे आता एक भाजी करायचंही जीवावर येतं. ही लक्षणे म्हणजे आळस किंवा थकवा नव्हे. ही नैराश्याची लक्षणे आहेत. नैराश्य आलेल्या किंवा डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला आयुष्यातील अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतही रस वाटत नसल्याने त्या गोष्टी करू वाटत नाहीत. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये जर असा बदल दिसत असेल तर , आळशी झालीये , घरात बसून काही काम नसतं म्हणून असं होतं , जरा बाहेर पड , फिरून ये , जग बघ म्हणजे कळेल , इतकंही नाही जमत मग काय उपयोग? असले शब्द वापरून आणखीन निराश करण्यापूर्वी एकदा या गोष्टीचा नक्की विचार करा. रोजची अगदी साधीसाधी वाटणारी कामं करणंही जेव्हा कठ...

आयुष्य फक्त काटेच वाट्याला देतं असं नाही, कधीकधी फुलंही देतं!

Image
लिहू की नको असा विचार करत होते पण लिहीतेच. आयुष्य कधीकधी क्रूर चेष्टा करतं तसंच ते कधीकधी आपल्याला भरभरून देतही असतं, यावर विश्वास बसावा म्हणून लिहिण्याचा हा अट्टाहास! आयुष्याने दिलेली संधी एकदा डोळसपणे पाहता आली पाहिजे बस्स! कौन्सिलिंगसाठी अनेक फोन येत असतात. मेसेज येत असतात , यात काही खरंच खूप गरजू असतात , काही लोकांना फक्त टाईमपास करायचा असतो. कालही असाच एक फोन आला. कौन्सेलिंग घ्यायची आहे. मी फी घेऊन कौन्सिलिंग करते म्हटल्यावर, त्या मुलीने फोन ठेवला. पुन्हा अर्ध्या तासांनी तिचा मेसेज आला, फी किती घेता? मी तिला आकडा सांगितल्यावर ती पुन्हा गप्प झाली. तिने परत फोन केला आणि म्हणाली, तुम्ही काही कमी नाही का करू शकत फी मध्ये ? मी म्हटलं तू किती देऊ शकतेस तितके दे. पण यावेळी मी तिची थोडी चौकशी केली, “कशासाठी घ्यायचं आहे कौन्सेलिंग ? ” “डिप्रेशनसाठी , ” तिचं उत्तर. जरा सविस्तर सांगशील का? म्हटल्यावर , तिने सांगितलं, “माझा साखरपुडा झालाय आणि पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. पण माझ्या पास्टचे काही इस्स्यू आहेत, ज्यातून मला बाहेर पडता येत नाहीये.” मला वाटलं असेल काही, तरी प्रेमप्रकरण आण...

हेल्दी सेक्स लाईफ हेच आनंदी वैवाहिक जीवनाचं गुपित आहे..!

Image
नवरा-बायकोचा नात्यातील अत्यंत महत्वाचा पण तितकाच दुर्लक्षित मुद्दा म्हणजे हेल्दी सेक्स लाईफ. अनेक जोडप्यांमध्ये वरवर तरी सगळं काही छान सुरु असतं मात्र त्यांच्यातील इनर बॉंडिंग हरवलेलं असतं. नात्याला हेल्दी ठेवायचं असेल तर हेल्दी सेक्स लाईफ कशी असली पाहिजे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. नात्याची सुरुवात करतानाच जर या गोष्टी दोघांनाही माहिती असतील तर तुमचं नातं अजून स्ट्रॉंग, आनंदी होईल. नुकताच संसाराला लागलेल्या नव्या जोडप्यांनी तरी हा लेख आवर्जून वाचा. तुमच्या नातेवाइकांच्या किंवा मित्र-मैत्रिणीच्या लग्नात भलं मोठं गिफ्ट तर तुम्ही दिलंच असेल, आता सुखी संसाराचा राजमार्ग समजावून देण्यासाठी हा लेख त्यांच्याशी जरूर शेअर करा.  जोडीदारासोबत सेक्स कसा करावा याबाबत प्रत्येकाची कल्पना ही वेगवेगळी असते. जशी प्रत्येकाच्या भुकेचे प्रमाण, आणि टेस्ट वेगळी अगदी तसच काहीसं याही बाबतीत असतं. प्रत्येकवेळी आपला जोडीदार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकेलच असं नाही. सेक्सच्या बाबतीतील तुमच्या सगळ्याच कल्पना पूर्ण होतील अशा अपेक्षा ठेवू नका. परिपूर्ण सेक्स लाईफ अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. दांपत्य जीवनाचा...

एकमेका साहाय्य करू!

Image
सगळं आपापलं करायचं म्हणजे काय? काय काय करू शकतो आपण एकट्यानं? आपण आपले जेवण बनवू शकतो. त्यासाठी लागणारं अन्न नाही पिकवू शकत. प्रत्येक घटक पदार्थ आपणच पेरायचा, पिकवायचा, शिजवायचा आणि आपणच खायचा... कल्पना करून बघा. तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीने असहकार पुकारला तर काय होईल?  शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही, दुकानदाराने किराणा विकला नाही, दुधवाल्याने दुध आणून दिलं नाही... सगळं काही आपण एकटेच नाही करू शकत.  स्वावलंबन हे एका मर्यादेपर्यंतच योग्य आहे. आपण सगळे परस्परावलंबी जीव आहोत. म्हणून नाती, कुटुंब, समाज, गाव, खेडं, शहर या रचना तयार झाल्या.  मोटिव्हेशन म्हणून उगाच टोकाचं काही करण्यात अर्थ नाही. जसं आपण इतरांवर अवलंबून असतो तसंच काही गोष्टींसाठी इतर जीवही आपल्यावर अवलंबून असतात. कुणी मदत मागितली तर, करायचं आपणच असं म्हणून हतबल असणाऱ्या व्यक्तींना अजून एकटं पाडू नका. काहीच करणं शक्य नसेल तर निदान ऐकून तरी घेऊच शकतो.

म्हणतात ना लग्न पाहावे करून! पण लग्नानंतर होणाऱ्या कसरतीचं काय?

Image
लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. खरेदी , इव्हेंट , फोटोशूट , या सगळ्या गदारोळात आयुष्यात कायमसाठी येणारं एक नवं माणूस , नवी जबाबदारी आणि नवं नातं यांच्याशी जुळवून घेणं जमेल का ? हा प्रश्नही मनाला सतावत असतो. थाटामाटात लग्न झाल्यावर पहिली सुरुवात असते ती आयुष्यात आलेल्या या सगळ्या नवख्या गोष्टी समजून घेण्याची आणि या बदलाशी जुळवून घेण्याची! नवरा-बायको हे नातं कधीच फक्त दुहेरी नसतं. यात अनेक पदर असतात. पण हा सगळा डोलारा तेव्हाच नीट सांभाळला जाऊ शकतो. जेव्हा नवरा-बायको मधील नातं जास्त घट्ट, समंजस आणि अतूट असेल. आपल्या जोडीदाराशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात. पूर्वी नात्यांसाठी, नाती तगवण्यासाठी म्हणून काही विशिष्ट कष्ट घ्यावे लागतात , हे कुणाच्या गावीही नव्हतं. आता काळ बदलला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे नाती टिकवणं आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणं खूप महत्वाचं बनलं आहे. जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी , कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि उत्तरोत्तर हे नातं फुलवण्यासाठी कोणत्या गोष्टी फायद्याच्या ठरतील हे जाणून घेण्...