Posts

मी आणि माझी दुनिया 😁

Image
लहान असताना मला असं वाटायचं की या एकाच जगात दोन ✌️ दुनिया आहेत. एक वाली जिथे आपण राहतो आणि दुसरी सेम तू सेम अशीच पण कुठे आहे आपल्याला माहीत नाही. तर माझी कल्पना इथेच थांबली नाही, त्या माहीत नसलेल्या दुनियेबद्दल माझे विचार काही असे होते – इथली जी दुनिया आहे ज्यात आपण राहतो त्यापेक्षा ‘ती’वाली दुनिया खूप चांगली असणार आणि तिथे चांगले लोक असणार. तिथे एक चांगली ‘मी’पण असणार. म्हणजेच हुबेहूब माझीच प्रतिकृती पण, ती माझ्यापेक्षा चांगली असणार.🙄 तिला कधीच कुणीच ओरडत नसणार. 🤗 तर माझा असा प्लान होता की, मी या दुनियेतून त्या दुनियेत 🌞 जावं आणि त्या चांगल्या वाल्या माझ्या प्रतिकृतीला इथे पाठवावं आणि मी तिथेच चांगल्या दुनियेत राहावं. पण, त्या दुनिये पर्यंत जायचं कसं हेच माहीत नसल्यानं काही दिवसांनी मी ही कल्पना सोडून दिली आणि आहेत त्याच दुनियेत राहायचं असं ठरवून टाकलं.  पण, एकाच वेळी दोन समान जग असू शकतात असं मला का वाटत होतं कुणास ठाऊक. 🤔 त्या दुनियेत जे काय घडेल ते समजून घेण्याचा कुठला ना कुठला मार्ग आपल्याला कधी ना कधी सापडेल असंही वाटायचं. त्यानंतर काळाच्या ओघात कधी तरी माझी ही समांतर दुन...

प्रसाद म्हणूनचेन्नईच्या या मंदिरात दिले जाते ब्राऊनी, सँडविच आणि केक....

Image
“समय सबसे बडा जादुगार हैं,”असं म्हटलं जातं ते खरं आहे. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या पाहा ना... कधी काळी टीव्ही पाहण्यासाठी शेजारच्या घरी जाऊन बसावं लागायचं आणि आज टीव्ही आपल्या सर्वांच्या हातात आला आहे. (मोबाईलच्या रुपात हो!) अशा किती तरी बदलेल्या गोष्टी तुम्हालाही जाणवत असतील. पूर्वी देवळात गेल्यानंतर शांतपणे देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुजारी आपल्या हातावर प्रसाद म्हणून साखर, फुटण्याची डाळ, तीर्थ (साधं पाणीच), किंवा लाडू, खोबरं (असं जे काही भाविकांनी देवाला नैवेद्य म्हणून चढवलं असेल तेच) ठेवायचे. पण, आता या प्रथेतही मोठा बदल होऊ पाहतो आहे. jaydurgapeetham.org   चेन्नईतील पेडप्पाई भागातील एका मंदिरात चक्क ब्राऊनी, बर्गर, चेरी टोमॅटो सॅलड आणि सँडविच प्रसाद म्हणून वाटला जात आहे. कहर म्हणजे या प्रसादाच्या पाकीटावर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा शिक्का आणि उत्पादन तिथी, एक्सपायरी डेट देखील छापली आहे.   पेडप्पाई भागातील जय दुर्गा पिठ्म मंदिरातील फक्त प्रसादाचा मेन्यूच बदलेला नाही तर प्रसाद वाटण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाल...

कनिका टेकरीवाल, अवघ्या ३२व्या वर्षी कोट्यावधींची उलाढाल करणारी बिझनेसवूमन! /Kanika Tekariwal

Image
मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है| सिर्फ पंखो से कुछ नाही होता, हौसलों सें उडान होती है| स्वप्न आकाशाला गवसणी घालणारी असतात तेव्हाच वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते म्हणून तर वयाच्या २१ व्या वर्षी कॅन्सरला हरवून २२ व्या वर्षी स्वतःचा स्टार्टअप सुरु करणारी कनिका टेकरीवाल आज इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. आज जिकडे तिकडे कनिकाचीच चर्चा दिसते आहे. अर्थातच तिची झेपच इतकी उंच आहे की, चर्चा तर होणारच! google image अवघ्या ३२ व्या वर्षी दहा प्रायव्हेट जेट जिच्या नावावर आहेत ती कनिका आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. जगातील १०० श्रीमंत महिलांच्या यादीत तिने आपले स्थान निर्माण केले आहे आणि हे करत असताना वाटेतील प्रत्येक अडथळ्यावर तिने यशस्वी मात केलेली आहे.   एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी आज गाडी, रेल्वे,बस असे कित्येक पर्याय आहेत. त्यातही अति वेगवान पर्याय कुठला तर प्रायव्हेट जेट! पण, हा पर्याय किती लोकांच्या आवाक्यातला आहे? अगदी थोड्या. त्यातही ज्यांना हा पर्याय परवडतो त्यांनाही यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. प्रायव्हेट जेटने प्रवास करण्यासाठी ...

पुरेसा पोषक आहार मिळणे हे देखील अनेकांसाठी स्वप्न आहे...!

Image
अन्न ही प्रत्येक मानवाची मुलभूत गरज आहे. पण, आपल्या देशात पुरेसा पोषणयुक्त आहार न मिळाल्याने उद्भवणाऱ्या आजारामुळे दरवर्षी १७ लाख लोकांचा मृत्यू होतो. कित्येक भारतीयांना पोषक आहार ही आवाक्या बाहेरील गोष्ट वाटते. कमी पोषणयुक्त आहारामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट आणि डाऊन टू अर्थ नियतकालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणातून या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.   योग्य पोषणयुक्त आहार न मिळाल्याने श्वसनाचे आजार, मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार, अशा घातक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो आहे.   वैयक्तिक कमाईतील ६३% पेक्षा जास्त रक्कम जर फक्त अन्नधान्यावरच खर्च होत असेल तर असे अन्न परवडण्यायोग्य मानले जात नाही. अशा लोकांच्या आहारात फळे, ताज्या भाज्या, कडधान्य यांचा अभाव आढळून येतो. उलट त्यांच्या आहारात मांसमटण आणि चहा यांचेच प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. ज्याच्या अतिसेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.   जागतिक पोषण आहार अहवालानुसार जागतिक पातळीवर ४२% लोकांना पोषणयुक्त आहार परवडत नाही. भारतात हेच प्रमाण ७१% इतके आहे. ७०% भारतीयांच्या आहारात फळे,...

World's top coder ठरलेला कलश गुप्ता आणि त्याची अभिमानास्पद कामगिरी... !! वाचा तरी नक्की त्याने काय केलंय?

Image
भारताला बौद्धिक संपदेची परंपरा आहे. आजवर अनेक भारतीयांनी जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा, बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला आहे. विज्ञान असो की कला भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे. दिल्लीच्या कलश गुप्तानेही भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवून ही परंपरा कायम राखली आहे.   dnindia.com दिल्ली आयआयटीमध्ये इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या कलश गुप्ताने जगातील पातळीवर भारावल्या जाणाऱ्या कोडींग स्पर्धेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे टीसीएस कोडव्हिटा ( TCS-CodeVita season 10) ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी कोडींग स्पर्धा असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. ८७ देशातून एक लाख स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या एक लाख स्पर्धकांना मागे टाकत कलशने या स्पर्धेत आपला विजय नोंदवला आहे.   आयआयटी दिल्लीत शिकणाऱ्या कलशने JEE ( Engineering Entrance Exam/Joint Entrance Exam) परीक्षेतही संपूर्ण देशातून तिसरा क्रमांक पटकावला होता. दिल्ली विभागातून तो प्रथम आला होता.   कलशने या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले असून या स्पर्धेत दुसऱ्य...

काहीही न करता बसून रहाणं सुद्धा खूप मोठं काम आहे!

Image
कधी कधी सकाळी अंथरुणातून उठावंच वाटत नाही. कुठलंच काम करायला नको दिवस फक्त असाच निवांत असावा...असं वाटणं साहजिक नाही का? दररोज उठून आपण आपलं रुटीन धावपळीचं आणि प्रचंड धकाधकीचं जीवन जगतच असतो. त्यातून एखादा दिवस असा काहीही न करता घालवावासा वाटणं स्वाभाविक आहे. रोजच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येणं ही सामान्य बाब आहे. पण, आपल्याला कामाची इतकी सवय झालेली असते की, काहीही न करता कसं बसायचं? हेच कळत नाही. किंवा आपण बसून राहिलो तर अंगात आळस भरेल, शिवाय कामं तर केलीच पाहिजेत ना? त्याला पर्याय नाही असं म्हणत आपण स्वतःला रेटत नेतो. स्वतःवरच कामाची सक्ती करत राहतो. एखादा दिवस असं स्वतःला अजिबात जबरदस्ती न करता मस्त लोळत काढला जाऊ शकत नाही का? खरं तर हा प्रश्न बायकांना विचारायला हवा. कारण, असा एखादा दिवस त्याच्या नशिबी येणं म्हणजे स्वर्गीय सुखच. नाही का! रोजच्या कामातून सुट्टी ही हवीच. आपल्या शरीराला आणि मनालाही. काहीही न करू वाटणं, म्हणजे आपल्या शरीरानं आणि आपल्या मनानं पुकारलेलं बंडच असतं. अशावेळी काहीही न करता राहणं ही अवघड आणि काही करणं ही अवघड अशी द्विधा अवस्था होते आणि ती ठीक आहे.   ...

टोमण्यांना भिक न घालता क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण केले, रचला इतिहास!

Image
Image source Google क्रिकेट (Cricket) हे आता आतापर्यंत पुरुषी क्षेत्र समजलं जायचं. आता मात्र भारतीय मुलींनी याही क्षेत्रात आपला डंका वाजवायला सुरूवात केली आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या बाराव्या महिला वनडे क्रिकेट वर्ल्ड कप (women’s one day cricket world cup) मध्ये भारतीय महिला संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला चित करून इतिहास रचला आहे.   भारतीय संघातील नव्या दमाची खेळाडू पूजा वस्त्रकार ( Pooja Vastrakar) आणि अनुभवी खेळाडू स्नेहा राणा यांनाच या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे. पूजा वस्त्रकार हिने प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ही पटकावला. पूजाचा हा पहिलाच वर्ल्डकप सामना आहे. पहिल्याच संधीत इतिहास रचून त्याचे सोने करणाऱ्या पूजाचा वर्ल्डकप पर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला जाणून घेऊया या लेखातून.   २५ सप्टेंबर, १९९९ रोजी मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात पूजाचा जन्म झाला. तिच्या घरचे लाडाने तिला छोटी म्हणतात. पूजाला एकूण सहा भावंडं आहेत. दोन भाऊ आणि चार बहिणी. पूजा दहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. तिचे वडील बीएसएनएलमध्ये नोकरी करतात. आईनंतर तेच या मुलांची आई आणि बाप अशी...