पुरेसा पोषक आहार मिळणे हे देखील अनेकांसाठी स्वप्न आहे...!

अन्न ही प्रत्येक मानवाची मुलभूत गरज आहे. पण, आपल्या देशात पुरेसा पोषणयुक्त आहार न मिळाल्याने उद्भवणाऱ्या आजारामुळे दरवर्षी १७ लाख लोकांचा मृत्यू होतो. कित्येक भारतीयांना पोषक आहार ही आवाक्या बाहेरील गोष्ट वाटते. कमी पोषणयुक्त आहारामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट आणि डाऊन टू अर्थ नियतकालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणातून या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

 


योग्य पोषणयुक्त आहार न मिळाल्याने श्वसनाचे आजार, मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार, अशा घातक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

 

वैयक्तिक कमाईतील ६३% पेक्षा जास्त रक्कम जर फक्त अन्नधान्यावरच खर्च होत असेल तर असे अन्न परवडण्यायोग्य मानले जात नाही. अशा लोकांच्या आहारात फळे, ताज्या भाज्या, कडधान्य यांचा अभाव आढळून येतो. उलट त्यांच्या आहारात मांसमटण आणि चहा यांचेच प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. ज्याच्या अतिसेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

 

जागतिक पोषण आहार अहवालानुसार जागतिक पातळीवर ४२% लोकांना पोषणयुक्त आहार परवडत नाही. भारतात हेच प्रमाण ७१% इतके आहे.

७०% भारतीयांच्या आहारात फळे, कडधान्ये, ज्वारी, बाजरी सारखी धान्ये, यांचा समावेश अगदी कमी प्रमाणात असतो. उलट मासे, डेअरी उत्पादन आणि मटन यांचा वापरही अगदी मोजक्या प्रमाणात केला जातो.

image source : Google


२० वर्षावरील व्यक्तीसाठी दररोजच्या आहारात २००ग्रॅम फळाची आवश्यकता असते. मात्र प्रत्येक भारतीय व्यक्तीची ही गरज पूर्ण होऊ शकत नाही. दररोज एका व्यक्तीला ३००ग्रॅम भाजीची आवश्यकता असते मात्र प्रत्यक्षात १६८.७ ग्रॅम इतकीच भाजी मिळते. म्हणजेच किमान आहारही अनेकांच्या वाट्याला येत नाही.

 

एकीकडे भारत अनेक क्षेत्रात घोडदौड करत असताना दुसरी कडे आपल्या नागरिकांना पुरेसा पोषक आहार मिळू नये ही शोकांतिका नाही का? देशात कुपोषणाचा दर वाढत असल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळात आपल्याला याची खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. जागतिक पातळीवरही याचे मोठे दुष्परिणाम दिसू लागतील. आरोग्य आणि पर्यावरणाच्या बाबतीतील जागतिक उद्दिष्टे साध्य करणे हे निव्वळ एक स्वप्न बनून राहील.

या सगळ्या परिस्थितीत महागाईचाही फार मोठा वाट आहे.  कंज्यूमर फूड प्राईस इंडेक्स (CFPI) च्या सर्व्हेक्षणानुसार गेल्या एका वर्षात ३२७ % नी महागाई वाढली आहे. उत्पादन महाग झाल्याने अन्नघटकांचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. शिवाय लहरी हवामानाचा फटकाही याला थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहे.

Image source : Google


डाऊन टू अर्थच्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात अन्नधान्याच्या किमती या शहरी भागाच्या तुलनेत जास्त महाग झाल्या आहेत.

पुरेसे पोषक अन्न मिळणे हा सर्वांचा मुलभूत अधिकार असताना ही अनेकांना तो मिळत नाही.

Post a Comment

0 Comments