Posts

इंग्रजांना धूळ चारणारी पहिली भारतीय रणरागिणी : राणी वेलू नचियार!

Image
Image source : Google भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात १८५७ चा उठाव हा इंग्रजांविरोधातील पहिला उठाव मनाला जातो. पण, त्याच्याही आधी जेव्हा इस्ट इंडिया कंपनी भारतात हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा एका भारतीय राणीने इंग्रजांना असा धडा शिकवला होता की इंग्रजांनी पुन्हा तिच्या राज्याकडे डोळा वर करून पाहण्याचीही हिंमत केली नाही. आपल्या पतीच्या पश्चात आपल्या राज्याचे समर्थपणे रक्षण करणाऱ्या या राणीचे नाव होते राणी वेलू नचियार. इंग्रजांना धूळ चारणाऱ्या या राणीची यशोगाथा खूप कमी लोकांना माहिती आहे. या लेखाच्या माध्यमातून राणी वेलू नचियारच्या साहसी जीवनगाथेवर प्रकाशझोत टाकण्याचा एक प्रयत्न!   ब्रिटीश सत्तेविरोधात आवाज उठवणारी राणी वेलू नचियार ही पहिली राणी होती. १८५७च्या उठावाच्या आधी शंभर वर्षे या आपल्या राज्यातून इंग्रजांना पळवून लावले होते. यामुळे तिला भारताची पहिली स्वातंत्र्य योद्धा म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तामिळनाडूमध्ये आजही वीरमंगाई (वीरमाता/ brave lady ) म्हणून तिचा आदराने उल्लेख केला जातो.   राणी वेलू नाचीयार ही रामनाड राज्याचे शासक राजा चेल्लूमुत्थू वि...

तुमच्या नात्यात (Longterm relationship) या १० गोष्टी असतील तर....!

Image
Source : Google Image  व्हॅलेंटाइन विक ( Valentine week)   सुरू आहे. प्रेमाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळेच उतावीळ असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीविषयीच्या भावना व्यक्त करण्यामागचा हेतू एकच असतो ते म्हणजे नातं अधिकाधिक फुलवणं!   आपल्या आयुष्याचा जोडीदार कायम आपल्या सोबत राहावा असं वाटणं साहजिकच आहे ना? पण, काही नाती अशी शेवटपर्यंत टवटवीत राहत नाहीत. नातं अधिक काळ टिकण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. त्याला वेळ, आपुलकी, संवेदनशीलता, प्रेम, विश्वास, एकनिष्ठता, विवेक, समजूतदारपणा, अशा भावनांचे खतपाणी घालावे लागते. ज्या नात्यात या सगळ्या गोष्टी आवश्यक प्रमाणात असतात ते नाते दूरपर्यंत आपल्या सोबत राहते. ज्या नात्याला या गोष्टी मिळत नाहीत, ती लवकरच दम टाकतात.   आपली नाती दीर्घकाळ ( long term relationship) टिकावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर, तुमचा जोडीदार आणि तुम्ही दोघांमध्येही काही सकारात्मक गुण असणे आवश्यक आहेत. हे दहा गुण जर तुम्हा दोघांमध्येही असतील तर, नक्कीच तुम्ही आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगू शकाल.   १) प्रतिक्रिया देणे ( Responsiveness) – ज...

It's better to be a single parent than a toxic parent/ वाईट पालक होण्यापेक्षा एकल पालक होणं कधीही श्रेयस्कर!

Image
अमीर खान – किरण राव, (Amir Khan - Kiran Rao)  समंथा-नागा चैतन्या (Samantha - Nagachaitanya) आणि आता धनुष-सौंदर्या (Dhanush - Soundarya) अशा प्रसिद्ध कलाकार जोडप्यांनी घटस्फोट (stars who get divorce) जाहीर केल्यानंतर अनेकांनी नाराजी आणि नाखुशी व्यक्त केली. अर्थात आपल्या आवडत्या कलाकार जोडप्यांची अशी ताटातूट होणं चाहत्यांसाठी धक्कादायकच असतं. घटस्फोट म्हटलं की आपल्याकडे लगेचच सगळ्यांचे कान टवकारले जातात. सात जन्म एकत्र राहण्याच्या संकल्पनेचा अजूनही इतका पगडा आहे की, घटस्फोट ही बाब लोकांच्या सहजासहजी पचनी पडत नाही.   घटस्फोट असो की लग्न तो त्या दोन व्यक्तींमधला वैयक्तिक प्रश्न आहे असे आपल्याकडे समजलेच जात नाही. लग्न जुळवून देण्यापासून लग्न टिकवून ठेवण्यापर्यंत या प्रवासात फक्त दोघांचं असं काहीच नसतं. एक तर आपल्याकडे प्रेम विवाह खूप कमी होतात. अरेंज मॅरेज मुळे दोघांची ख़ुशी असो किंवा नसो पण कुटुंबियांच्या आनंदासाठी म्हणून कधीकधी अनेक जोडपी तडजोड करताना दिसतात. Image source : Google   अशा तडजोडीच्या नात्यात दोघांचीही होणारी घुसमट कुणालाही दिसत नाही आणि त्याबद्दल कुणाला दयाह...

Emotional Intelligence म्हणजेच भावनिक बुद्ध्यांक कसा राखावा?

Image
Image source : Google    बुद्ध्यांक हा शब्द तुमच्या चांगलाच परिचयाचा असेल. पण भावनिक बुद्ध्यांक हा शब्द तुम्ही कधी वाचला किंवा ऐकला आहे का? भावनिक बुद्ध्यांक म्हणजे, स्वतःच्या भावना ओळखता येण्याची, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करण्याची आणि भावनांचे नियंत्रण करण्याची क्षमता. प्रत्येक व्यक्तीकडे ही क्षमता असेलच असे नाही पण थोड्याशा प्रयत्नाने हे नक्कीच साध्य होऊ शकते. वैयक्तिक नातेसंबंध आणि व्यावसायिक संबंध अशा दोन्ही ठिकाणी जर याचा योग्य वापर करता आला तर व्यक्ति आयुष्यात यशस्वी होऊ शकते. बौद्धिक क्षमतेपेक्षाही ज्याचा भावनिक बुद्ध्यांक चांगला असतो ती व्यक्ति यशाच्या पायऱ्या सर करण्यात लवकर यशस्वी होते.   हा भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवावा याबद्दल काही टिप्स इथे देत आहोत. १)       प्रश्न विचारा – तुम्हाला जर प्रश्न विचारण्याची सवय असेल तर ही एक एकदम चांगली सवय आहे. प्रश्न विचारल्याने आपल्या ज्ञानात, माहितीत भर पडते. कधीकधी स्वतःला प्रश्न विचारणेही सोयीचे ठरते. म्हणजे एखाद्या वेळी उदास, निराश, हताश वाटत असेल किंवा कुणाचा राग आला असेल, अशा वेळी स्वतः...

Time is money! या संकल्पनेचा असाही वापर होऊ शकतो.

Image
Image source Google वेळ हीच संपत्ती ( Time is money) असे म्हटले जाते. काही लोक याचा आयुष्यात अगदी हुशारीने वापर करतात तर काही लोकांना मात्र वेळेचा सदुपयोग करणं जमत नाही. काही लोक स्वतःपेक्षा जास्त इतरांवरच वेळ खर्च करतात. थोडक्यात काय तर वेळ ही अशी गोष्ट आहे जी हळूहळू आपल्या हातातून निसटून जाते आणि आपल्याला कळतही नाही. अशी ही वेळ कधी बँकेत डिपॉझिट करता येईल का? तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा वेळ कशी काय बँकेत जमा करून ठेवता येईल? असं शक्य असतं तर जग किती बदललं असतं. पण स्वित्झर्लंडने ही अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवली आहे.   अलीकडेच स्वित्झर्लंडने एका नव्या संकल्पनेची सुरूवात केली आहे, ज्यानुसार तिथल्या लोकांना त्यांच्या वेळेच्या बदल्यात ते हवी ती वस्तू किंवा सेवा घेऊ शकतात. ही काय भानगड आहे नेमकी? तर स्वित्झर्लंडने नुकतीच एक Time Bank नावाची संकल्पना राबवायला सुरूवात केली आहे. या संकल्पनेनुसार देशातील नागरिक त्यांच्या फावल्या वेळेचा सदुपयोग इतरांना विशेषत: ज्येष्ठ नागरिक ज्यांना मदतीची गरज आहे, अशा लोकांसाठी करतील. त्यांचा हा वेळ त्यांच्या social security account मध्ये जमा ह...

या ८ वर्षाच्या मुलाने असे काय केले की त्याला रातोरात प्रसिद्धी मिळाली?

Image
Image source Google आयुष्यात कुठल्या क्षणी काय जादू घडेल सांगता येत नाही. एखादी गोष्ट अगदी सहज, मनापासून, आनंदाने केली जाते ना तेव्हा त्याचं फळ हे मिळतंच मिळतं. आता हे पटत नसेल तर आठ वर्षाच्या डीलोन हेल्बिगची ( Dillon Helbig ) ही गोष्ट तुम्ही वाचायलाच हवी. फक्त आठव्या वर्षी डीलोनला ते मिळालं आहे ज्याची त्याने स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती.   आठ वर्षाचा डीलोन अमेरिकेतील बॉईजी शहराचा रहिवासी आहे. त्याचे वडील अॅलेक्स हेल्बिग एक संगीतकार आहेत. आठ वर्षांच्या डीलोनला पुस्तकांच खूप आकर्षण आहे. आपल्या आजीसोबत तो अगदी लहान असल्यापासून शहरातील ग्रंथालयात जातो.   पुस्तकांच्या या आकर्षणातूनच त्याला स्वतःलाही एक पुस्तक लिहावं असं वाटू लागलं. आता आठ वर्षाचं मुल कसलं पुस्तक लिहिणार? पण डीलोनने मात्र लिहिण्याचं खूपच मनावर घेतलं. तो पाच वर्षांचा असल्यापासूनच काही ना काही लिहित असतो. तर आता एखादं कॉमिक बुक ( comic book) का लिहू नये, अशा विचारानं त्यानं लिहायला घेतलं.   या वर्षीच्या ख्रिसमसला त्याला जो अनुभव आला तोच कॉमिक रुपात सांगायचा, असं त्यानं ठरवलं. तब्बल चार दिवस खपून ...

जंगलाचं शिष्यत्व पत्करायला हवं!

Image
लॉकडाऊन नंतर घरातून बाहेर पडावं, थोडं फिरून यावं असं प्रकर्षानं वाटू लागलं. फक्त कीबोर्ड बडवण्याच्या नादात आपण घर कोंबडे कधी झालो हेच कळलं नाही. अशातच एका मित्राने मंदार वैद्य यांची ओळख करून दिली. त्यांच्या स्टेटसवरील निसर्गरम्य ठिकाणांचे फोटो पाहून तर फिरण्याची इच्छा आणखी आणखी तीव्र होऊ लागली. त्यांना एकदा दोनदा हटकलं देखील. कुठे आहेत ही ठिकाणं? आम्हालाही बघायचं आहे, वगैरे. आम्ही लवकरच ट्रीप प्लन करू तेव्हा कळवू असं ते म्हणाले.  अशातच दोन चार महिने गेले असतील आणि एक दिवस त्यांचा व्हाट्सअपवर मेसेज आला. राधानगरी-दाजीपूर जंगल सफारीचा. ही सहल म्हणजे माझ्यासाठी अगदी पर्वणीच होती. मग काय मी आणि दोन मुलं असं तिघांचीही जागा कन्फर्म केली आणि शेवटी ९ जानेवारी २०२२चा तो दिवस उजाडला. यावर्षात मनसोक्त फिरून घ्यायचं असा संकल्प केलेल्या माझी या वर्षातील ही पहिलीच सहल! पण हा अनुभव नितांत सुंदर होता. इतका की आठवणीच्या गाठोड्यातून काही सुंदर क्षण काढायचे असं ठरवलं तर पाहिलं आठवण होईल ती म्हणजे या टीम सोबत केलेल्या राधानगरी-दाजीपूर परिसराच्या या सहलीची! याला कारणंही तशीच आहेत.  जंगल पाहणं, जंगल...