नात्याच्या बाबतीत चोखंदळपणा हवाच!
काही लोक कुठलीही वस्तू घेताना, खरेदी करताना किती पारखत बसतात. त्यांना जशी हवी तशी वस्तू मिळाल्याशिवाय ते खरेदी तर करणार नाहीतच पण, ‘घे रे आता अॅडजस्ट करून,’ असे म्हटले तर ऐकणारही नाहीत. एकदम चोखंदळ. वस्तूच्या बाबतीत ठीक आहे पण काहीजण नात्याच्या बाबितीतही तितकेच चोखंदळ असतात. थोडसं जमवून घ्यावं नमतं घ्यावं आपल्या अपेक्षांना मुरड घालावी यातलं काही म्हणता काही त्यांना जमत नाही. त्यांच्या अटीवर ते ठाम असतात. इतका पण काय तो चोखंदळपणा किमान नात्याच्या बाबतीत तरी बरा नव्हे हं! असा सूर तुम्ही आजूबाजूला अनेकदा ऐकला असेल. Image Source : Google “काय बाई किती पोरी बघितल्या तरी या सुदेशला एक पोरगी पसंत पडत नाही. कुठली अप्सरा आणणार आहे कुणास ठाऊक?” “मुलीचं वय काय आणि यांच्या अपेक्षा काय, जरा तरी कुठे तडजोड नको का करायला? कायमची घरात बसली की मग कळेल.” असे टोमणे आणि चर्चा तुमच्याही कानावर पडत असतील. केवळ या टोमण्यांपासून तुमची सुटका व्हावी म्हणून जर तुम्ही घाई केलीत तर पुढे जाऊन तुम्हालाच पश्चाताप होणार आहे. नात्यांच्या बाबतीत चोखंदळपणा दाखवलेला अनेकांना आवडत नाह...