Posts

Showing posts from June, 2023

ध्यानाबद्दलचे हे प्रश्न तुम्हालाही पडतात का?

Image
सर्वांसाठीच ध्यान करणे फायद्याचे आहेच. त्यातही चिंता, अतिविचार, नैराश्य, निद्रानाश अशा मानसिक विकारांनी ग्रस्त लोकांसाठी ध्यान करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. एकदा ध्यानाला सुरूवात केल्यानंतर ध्यान दिवसातून कितीवेळा आणि कितीवेळ करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो. सुरूवात करताना तुम्ही अगदी कमी वेळ घेतला तरी हरकत नाही. हळूहळू तुम्ही ही वेळ वाढवू शकता. अमुक इतका वेळ ध्यान केलं तरच त्याचा फायदा होतो असा काही नियम नाही. ध्यान करण्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमचं सातत्य. सुरुवातीलाच जर तुम्ही फार मोठी अपेक्षा ठेवली तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे म्हणून सुरुवातीला ध्यानामध्ये सातत्य राखणे हेच ध्येय ठेवा. ध्यानातून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार लगेच करू नका. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने याचे फायदे दिसून येतात.  सुरुवातीलाच तुम्ही तास किंवा अर्धा तास तरी ध्यान करणारच असा हट्ट करून बसलात तर तुमचं ध्यान व्यवस्थित होणार नाही आणि त्याचे अपेक्षित परिणाम पण दिसून येणार नाहीत. ध्यान करून झाल्यानंतर तुम्हाला अधिक उत्साही आणि फ्रेश वाटलं पाहिजे. ध्यान सुरू केल्यानंतर अपेक्षित परिणाम लगेच दि...

ध्यान करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या!

Image
Image source : Google  ध्यान म्हणजे काय याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही लोकांसाठी तर ध्यान म्हणजे आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते. काही लोकांना ध्यान म्हणजे एखादी गूढ क्रिया वाटते. परंतु वास्तवात ध्यान ही एक सहज सुंदर गोष्ट आहे.  या लेखातून आपण ध्यान म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. ध्यान कोणकोणत्या प्रकारे करता येते आणि त्याचे फायदे काय आहेत हेही पाहू.  सरळ सोप्या भाषेत सांगायचे तर ध्यान म्हणजे विचार, चिंतन किंवा आपल्या भावनांचे परीक्षण करणे. खरे तर आपण बरेचदा नकळत या गोष्टी करत असतोच. पण, जाणीवपूर्वक आणि शक्य तितक्या तटस्थपणे आपल्या विचारांचे, भावनांचे परीक्षण करणे म्हणजे ध्यान असे म्हणता येईल. ध्यान करण्याची विशिष्ट पद्धती आहे का? खरे तर ध्यानाचा अमुक एक मार्गच बरोबर आणि दुसरा चुकीचा असं काही म्हणता येणार नाही. तुम्हाला ज्या मार्गाने ध्यान करणे आवडेल आणि ज्या पद्धतीने ध्यान केल्याने तुमच्या मानसिकतेत फरक पडेल तो मार्ग, ती पद्धत तुम्ही बिनधास्तपणे स्वीकारू शकता.  एका ठिकाणी मांडी ठोकून, डोळे झाकून बसणे म्हणजेच ध्यान असं अजिबात नाही.  जगातील प्रत्येक...

जाणून घेऊया मेडिटेशनबाबतचे समज आणि गैरसमज !

Image
मेडिटेशन कसे करावे? आपण योग्य पद्धतीने मेडीटेशन करतो की नाही? मेडिटेशन करताना विशिष्ट अनुभव आलेच पाहिजेत का? मेडिटेशन सुरू केल्यानंतर लोकांना असे अनेक प्रश्न छळत असतात. विशेषत: मेडिटेशन योग्य पद्धतीने होते की नाही हे कसे ओळखायचे, या बाबतीत लोकांच्या मनात बराच संभ्रम असतो.  मेडिटेशनचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ताणताणाव हाताळण्यासाठी, कठीण प्रसंगात मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी, मनातील गोंधळ टाळण्यासाठी, एखाद्या शारीरिक व्याधीशी झुंजत असताना आणि भावनिक समतोल राखण्यासाठी याचा फायदा होतो.  परंतु यासोबत अनेक गैरसमज जोडले गेले आहेत ज्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनात मेडिटेशन बद्दल एक गूढ आकर्षण तर वाटतेच पण ही गोष्ट आपल्या आवाक्यातील नाही असेही वाटते.  तुम्हाला मेडिटेशन करण्याची भीती वाटत असेल, कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मेडीटेशन करता येत नाही असे वाटत असले तरी तुम्ही मेडिटेशन करत राहा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असे म्हटले आहेच. जेव्हा तुम्ही नियमितपणे मेडिटेशन करत राहाल. तेव्हा त्याचे फायदे तुम्हाला जाणवू लागतील....

अत्याधिक संवेदनशील असणे म्हणजे काय? या व्यक्तींचे काही खास गुण जाणून घ्या. (What is hyper sensitivity, know more)

Image
 अरे किती विचार करशील दे ना सोडून... असं कुणी कितीही सांगितलं तरीही एखादी व्यक्ती मनातून काही गोष्टी लवकर काढत नाही. झालेली घटना , प्रसंग किंवा साधा संवादही अशा व्यक्तीच्या मनात सतत घोळत असतो. वरवर पाहता ही एक प्रकारची एंक्झायटी वाटत असली तरी काही व्यक्तींच्या बाबतीत हा कुठलाही मनोविकार नव्हे तर तो त्यांच्या व्यक्तीमत्वाचाच प्रकार असतो. ज्याला आपण ‘टू सेन्सिटिव्ह’ असं म्हणून उडवून लावतो. पण , या ‘टू सेन्सिटिव्ह’ व्यक्ती नेमक्या असतात तरी कशा ? याचा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर आणि त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या लोकांवर नेमका काय परिणाम होतो जाणून घेऊया या लेखातून. हायली सेन्सिटिव्ह व्यक्ती ( HSP) हा एक व्यक्तिमत्वाचा दुर्मिळ प्रकार आहे. एकूण लोकसंख्येपैकी फक्त २०% लोकं या प्रकारात मोडतात. त्यातही HSP असलेल्या दोन व्यक्तींमध्ये कमी अधिक तीव्रता जाणवू शकते. या व्यक्तींच्या मेंदुतील अंतर्गत रचनेमुळेच अशा व्यक्तीना बाह्य किंवा अंतर्गत चेतना अधिक तीव्रतेने जाणवते. यांची ज्ञानेंद्रिये अत्याधिक संवेदनशील असतात. इलेन अरोन आणि आर्थर अरोन या दोन मानसशास्त्रज्ञांनी १९९०च्या दशकात H...

फाटक्या पदरात अमुल्य रत्नं का बरं टाकत असेल देव?

Image
गावातल्या माळावर त्यांचा पाल पडलेला होता. कित्येक दिवस गावात राहिल्यानंतर आज त्यांनी आपली पालं उचकटली होती. सगळं समान गाडीवर घातलं. सोबतची सगळी लोकं पुढे निघून गेली होती. मागे एक बाप आणि त्याच्यासोबत तीन चार वर्षांचा छोटा मुलगा. बहुतेक त्याला घेऊन आता तो निघणार होता. पण त्या मुलाचं काही तरी बिनसलं होतं आणि तो रडत होता. टेन्शन वाढलेल्या बापाने पायातली चप्पल काढली आणि त्या छोट्या लेकराच्या पाठीत धपाधप चार-पाच फटके हाणले. असह्य होतं ते दृश्य. पण काय करणार होते. त्याच्या हातातून त्याचं मुल हिसकावून घेण्याइतपत तर धाडस नव्हतं. शेवटी तो बाप होता. माझी उपरी माया त्यापुढे किती दिवस टिकली असती...? पण त्यावेळी जाणवलेली वेदनाही खोटी नव्हती. आज कित्येक वर्षांनी अचानक तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला आणि आजही माझ्या डोळ्यात पाणी आलंच. हतबलपणे अशा प्रसंगाचं साक्षीदार होणं, हेही एक दु:खच! या अशा प्रसंगानीच तर शिकवलं आपल्या दुखाचा कधी बाऊ करायचा नाही. रडायला होईल. पडायला होईल. पण लढण्याची ताकद कधी गमवायची नाही. कारण , इथे प्रत्येकाच्या वाट्याला आपापली लढाई आहेच. ती कुणालाच चुकलेली नाही. तरीही एकच...

शांत राहण्याच्या या फायद्यांकडे बरेचदा आपलं दुर्लक्ष होतं.

Image
शांत राहण्याचे पण काही फायदे असतात. पण सध्याच्या काळात शांत राहणे म्हणजे दु:खी असणे असा एक विचित्र अर्थ लावला जात असल्याने कुणालाच शांत राहू वाटत नाही. सतत काही ना काही करत राहिल्याने आपल्यातील जिवंतपणा, उत्साह, टिकून राहील किंवा या गोष्टींमुळे आपण इतरांना आकर्षित करतो असं अनेकांना वाटत असलं तरी हे चुकीचं आहे.  मोबाईलची रिंगटोन, सतत ध्यान खेचणारे नोतीफिकेशन्स, स्क्रोलिंगचे वाढलेले प्रमाण, अपडेट राहण्याची तीव्र गरज, अशा अनेक कारणांमुळे आपलं लक्ष सतत विचलित होत राहतं.  आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा शो ऑफ करण्याच्या या चढाओढीत सगळ्यापासून दूर जाऊन शांत रहाणं सोपं नाही. पण प्रयत्न केल्यास अशक्यही नाही. शांत राहिल्यानं आपलं मन अधिक एकाग्र होतं. आपल्यातील कल्पकता वाढते. नवनव्या गोष्टी सुचू लागतात. काम करण्याचा उरक आणि क्षमता वाढते. कामातील चुका कमी होतात. कंटाळा कमी होऊन काम करण्याचा उत्साह वाढतो. शांत राहण्याचे भरपूर फायदे आहेत. शांत राहण्याचा आणखी एक फायदा म्हणजे स्वतःचे परीक्षण करता येते. स्वतःबद्दल अधिक विचार करता येतो. यामुळे इतर लोकांशी जुळवून घेण्याची, त्यांना समजून घेण्याची ...