तुमच्या तणावाचा ताण तुमच्या खिशाला तरी सोसावा लागत नाही ना? एकदा तपासून बघाच.
इतर कुठल्याही भावनेपेक्षा तणावाची भावना खूपच जास्त प्रभावी आणि दमनकारी असते. कुठल्याही एका गोष्टीचा जरी आपल्या मनावर तणाव राहीला असेल तर, त्याचा प्रभाव आपल्या इतर कामांवरही दिसून येतो. तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न कराल त्यात हा तणाव अडकाठी आणल्याशिवाय राहणार नाही. कालपर्यंत ज्या गोष्टी आपण अगदी सहजतेने करू शकत होतो त्याच गोष्टी करताना आज मात्र अचानकच अवघड आणि कठिण वाटू लागतात. तणाव तुमची आर्थिक घडीही विस्कटू शकतो. तणाव आणि पैसा यांचा तर खूप जवळचा संबंध आहे. अनेकांसाठी अपुरा पैसा हाच तणावाचे मोठे कारण असतो. Image source : Google सगळी नाटकं करता येतात, पण पैशाचे नाटक करता येत नाही असे म्हटले जाते. म्हणूनच आपल्या भावनांचा आपल्या खिशावर परिणाम होतो का हेही एकदा तपासून पाहूयात. तणाव निवळावा म्हणून आपण अधिक खातो. म्हणजे नकळतपणे आपल्याकडून अधिक खाल्लं जातं, हे जसं आपल्या लक्षात येत नाही तसच तणावामुळे आपण आपल्या खिशातील पैसे वाया घालवतोय हेही कळत नाही. आज मूड ऑफ आहे, मग काय करावं बरं...? “पिज्झा वगैरे मागवूया,” किंवा “आज जरा कॉफीसाठी बाहेर जाऊया.” “आज एक खंबा होऊनच जाऊदे, खूप दिवस झ...