कामातील आनंद कसा शोधाल?
Image source : Google |
रोज
रोज तेच ते काम करण्याचा कंटाळा प्रत्येकालाच येत असतो. पण, भरपूर कष्ट
केल्याशिवाय फळ मिळत नाही, अशी एक समजूत काही लोकांच्या मनात ठाण मांडून बसलेली
असते. म्हणून काही जण कामाचा गाडा ओढत राहतात. निव्वळ कष्ट उपसण्यासाठी म्हणून आणि ओढूनताणून केलेल्या
कामात कसलाच आनंद मिळत नाही. मग हे काम ऑफिसमधील असो किंवा घरातील. छोट्यातील छोटे
काम पहिले तरी काही जणांना घाम फुटतो. अशा लोकांवर बहुतेकवेळा आळशीपानाचा शिक्का
बसण्याचीही शक्यता असते. पण यामागचे खरे कारण आळस नसून काम करण्याची चुकीची पद्धत
किंवा नावड हेही असू शकते.
रोज
रोज कामाची एकच निरस पद्धत व्यक्तीला आतून रुक्ष बनवते म्हणून काम करताना आनंद
वाटेल अशा काही पद्धती आपण शोधून काढल्या पाहिजेत. जेणेकरुन हातातील कामाचा कंटाळा
येणार नाही. आपलं दररोजचं रुटीन ठरलेलं असतं. कधी तरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा
या दैनंदिन कामात थोडाफार फेरफार केल्यास त्यातला कांटाळवाणेपणा कमी होईल. कामाचा
आनंद वाटेल. जे काम करताना आपल्याला आनंद होतो त्या कामात आपली कार्यक्षमता वाढते.
त्यातील बारकावे आपल्याला अधिक खोलवर समजू लागतात आणि कामाचा उरकही वाढतो. काम
म्हणजे ओझं वाटून राहत नाही. म्हणून आपल्या कामात कशाप्रकारचे बदल केल्यास त्यातील
उत्साह टिकून राहील हे बघितलं पाहिजे.
कामाचं
ओझं वाटू लागल्यास आपला मूड बिघडतो. मग चिडचिड वाढते आणि आपण यातच गुरफटून बसलो की
नैराश्य येतं. आपल्याला काही जमतच नाही किंवा जमणारच नाही अशा नकारात्मक भावना मूळ
धरू लागतात. याउलट कामाचा आनंद घेता आला तर कामाचा ताणही जाणवणार नाही आणि थकवाही.
तुम्ही
जर ‘इकीगाई’ हे जपानी संस्कृतीतील एक संकल्पना समजावून देणारं पुस्तक वाचलं असेल
तर त्यात बिल गेट्स यांच एक उदाहरण आलं आहे. बिल गेट्स यांनी भांडी घासण्याच्या
कामाचा कंटाळा येऊ नये म्हणून त्याचा एक पॅटर्न ठरवला होता. उदा. आधी छोटे छोटे
चमचे धुवायचे, मग प्लेट आणि मग मोठी जेवणाची भांडी. हा विशिष्ट पॅटर्न फॉलो करताना
त्यांना भांडी घासण्याचा अजिबात कंटाळा वाटत नसे उलट ते काम त्यांच्यासाठी आणखी
मजेदार बनले.
आपले
काम करतानाही आपण असेच काही पॅटर्न ठरवून घेतले. त्यांचा आलटून-पालटून प्रयोग केला
तर नक्कीच काम म्हणजे एक गंमत होऊन जाईल आणि त्याचा फारसा कंटाळाही नाही वाटणार.
Image source : google |
कामातील
मजा वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात आणखी गमतीजमती अॅड करू शकता. उदाहरणार्थ
गाणी ऐकत काम करणे, काम करताना आधी सोप्या गोष्टी हातावेगळ्या करणे आणि मग क्लिष्ट
गोष्टीना हात घालणे. एखाद्या विशिष्ट सुगंधामुळेही आपला मूड प्रफुल्लीत होतो. तेव्हा
काम करताना आपली आवडती अगरबत्ती धूप किंवा परफ्युम फवारणे अशा गोष्टींनीही काम
करण्याचा उत्साह वाढतो. ज्या ठिकाणी तुम्ही काम करण्यासाठी बसता तिथली रचना
तुम्हाला सोयीची ठरेल अशा बदलून घेणे. सलग बसून कंटाळा आला तर दहा मिनिटे
चालण्याचा ब्रेक घेणे. या काही टिप्स तुम्हाला तुमचा मूड सुधारण्यासाठी आणि कामाचा
कंटाळा घालवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील.
सलग
काम न करता मध्ये छोटा ब्रेक घेणे आणि यावेळेत काहीही न करता शांत बसणे, ज्यामुळे
मनाला आणि मेंदूलाही थोडा आराम मिळेल.
अशा कितीतरी ट्रिक्स तुम्ही स्वतः शोधू शकता. इतरांकडून शिकू शकता आणि आपली कार्यक्षमता वाढवू शकता. तुमची कामे तुम्ही जेव्हा आनंदाने पार पडता आणि त्यात तुम्हाला आनंद मिळू लागतो तेव्हा तुमच्या व्यक्तीमत्वातही काही सकारात्मक बदल दिसू लागतील. हे बदल तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जाण्यास निश्चितच सहाय्यक ठरतील.
Comments