Posts

मैत्रीचा वेल

मैत्रीचा वेल                    निधीने सगळी बॅग व्यवस्थित. भरली. एक्झामसाठी लागणार सगळ साहित्य, पेपर, पेन्सील, कलर पेन्सिल्स, रबर शार्पनर, क्राफ्टबुक, सगळं नीटनेटकं दप्तरात भरलं. आईने टिफीन बॅग तयारच ठेवली होती. १० मिनिटात स्कूलबस येईलच.  सॉक्स, शूज घालून निधी स्कुलबसची वाट पहात थांबली. पों पों हॉर्न वाजवत बस आली. हॉर्नचा आवाज ऐकून निधीची आई बाहेर आली, निधीने जाता जाता आईला बाय बाय केलं आणि पटकन बसमध्ये चढली. शाळेत गेल्यावर सगळे आपआल्या जागी बसले. आज क्राफ्ट अॅण्ड ड्रॉईंगची एक्झाम होती. रूबीना मिस वर्गात आल्या, आल्या त्यांनी मुलांना काही सुचना दिल्या आणि क्राफ्ट साठी एक तसेच ड्रॉईंगसाठी एक असे दोन वेगवेगळे विषय दिले. निधीने आधी ड्रॉईंगच साहित्य वर काढुन ठेवल.            स्निग्धाही आपल्या बॅग मधुन एकेक साहित्य काढू लागली, ‘अरे बापरे, हे काय, तिने तर कलर पेन्सिली आणल्याच नव्हत्या गडबडीत. आता मिस सगळ्यांसमोर ओरडतील, आपल्याला ड...

आमची मस्ती-आमची दोस्ती

आमची मस्ती-आमची दोस्ती .         इशान, देवम, शाहीन, गौरी, वेदिका सगळे जण एकत्र जमुन खेळत होते. ही त्यांची नेहमीची वेळ, बिल्डिंगच्या खाली पार्किंगसाठी जी जागा आहे, तिथच जमायचे...

"उदास निळे डोळे"

उदास निळे डोळे दुपारच्या वेळेत मी बाळाला घेऊन पडले होते. इतक्यात दारावर टकटक झाली...... दुपारचे दिड वाजलेले म्हणजे नक्की हेच असणार...... मी उठले. दरवाजा उघडला. दारात हेच होते ..... पण एकटे नाही..... !! त्यांच्या मागे एक विशीच्या आसपासची,  काळी सावळी, टपोर्या डोळ्यांची चुणचुणीत तरुण मुलगी उभी होती.  मी तिच्याकडे पाहून हसले, तीही अगदी माफक हसली. आत आल्यावर ह्यांनी ओळख करून दिली. "ही  आरती, कॉलेजच्या अॅडमिशनसाठी आले, नंदुरबारवरून."  "हो का... येना..... आरती....!!        त्या दोघांच आटपेपर्यंत मी ताटं वाढली.  आम्ही जेवायला बसलो, “इतक्या दुरून इकडे आलीस कॉलेजसाठी, तुमच्याकडे नाही का कॉलेजची सोय?” तीनं नुस्तच एकदा माझ्याकडे पाहिलं, परत ह्यांच्याकडे पाहिलं. “मग हेच बोलले आदिवासी मुलांसाठी इथे शासकीय वसतिगृहाची सोय आहे. त्या मुलांना उच्चशिक्षणासाठी इथेच यावं लागतं.” “ अवघडच आहे की, इकडे एवढ्या लांब काय गरज हॉस्टेलची?” “सरकारी योजना काय करणार?” हे म्हणाले, आरती अजिबात बोलत नव्हती. मी तिला काही विचारलं तरी ती ह्य...

सावधान….कोर्ट फितुर आहे!!

मला कुणीतरी आवाज दिला. व्यक्ती परिचित वाटली. “तुम्हाला बोलवलय कोर्टात.” “मी काय केलं?” “ते तिथं येऊन विचारा.” “आत्ता नाही जमणार.” “यावच लागल.” “ऊन किती झालय, मला त्रास होतो, ऊनाचा.” “ऊनाचा कसला त्रास? एवढं साजुक होऊन जमत नसतय चलाच.” “पोरगं?” “नको पोरगं, ठेवा घरातच.” “असकसं? रडल ना ते.” कळवळुन. “रडू दे.” काय माणूस तरी, एवढ्याश्या माझ्या लेकराला रडू दे म्हणतो. त्याच्या मागुन गेल्या शिवाय पर्याय नव्हता. मुलाला ठेवलं घरातच. मी त्याच्या मागमाग, तो पुढपुढ. रणरण ऊन. काय झालय माहित नाही, कुणी बोलवलय माहित नाही, का बोलवलय माहित नाही. हा माणुस म्हणतो म्हणुन याच्या मागमाग जायच. त्याला आपण ओळखतो का नीट हे पण माहित नाही. पायांना घाम सुटलेला, चपलातुन पाय सटकत होते. पदर डोक्यावर घेतला तर, मान घामानं भिजती, नाही घेतला तर, डोकं ऊनानं भाजतय. मग लक्षात आलं, याच्या गडबडीत केस पण नाही विंचरल, तोंडावर पाणी पण नाही मारलं, कसे दिसत असु आपण? विचारावं का यालाच? छे….! परक्या माणसाला बाई माणसानं कायपण विचारायच नसतं. मुर्ख! पायाला घाम सूटल्यानं भरभर चालणं जमत नव्हत. त्याच्यात आणि ...

पोरकी

सकाळचं तिरप ऊन वरवर चढत होतं. एका हातात चहाची किटली आणि दुसर्या हातात कपड्याचं बोचकं घेऊन सुखुबाई लगबगीन चालली होती होती. भराभरा चाललं कि हातातली किटली डचमळायची.  डचमळणारी किटली आणि दुसर्या हातातलं ते बोचकं सावरत ती निघाली होती. “काय वं ताईसाब कुटं निगालासा?” माळावरनं घराकडं निघालेल्या शांताक्कान तीला हटकलं. “काय नाय बाय, सुजीला दवाखान्यात नेलिया पहाटेला कळा सुटल्याता, अजून डॉक्टरचा पत्ता नव्हता, सिस्टरनीला बी सकाळी जाऊन उठवून आनली. म्हनल जरा च्या तरी देवावा म्हून आल्तु.” “अगं बाय पोरगी तेवडी हातापायानं धड सुटू दि म्हंजी झालं."  शांताक्का काळजीन बोलली. तायसाब उचला भरारा पावलं अवघडल्या पोरगीला एकटीला टाकून आलायसा काय म्हणायचं तुमासनी.” “व्हय बाय चल.” दोघी भराभरा चालत दवाखान्याजवळ पोचल्या. सुजी वाकून पोट धरून एकटीच फिरत होती. पाटलाची म्हातारी सकाळीसकाळीच आलेली दवाखान्यात. तेवढी तिचीच सोबत होती सुजीला. सखुबाईनं आणलेलं समान समोरच्या बाकड्यावर ठेवलं. ती सुजीजवळ जाताच सुजीनं तिचा हात घट्ट पकडला. “आय लय दुखतंय बाय.... आय काय करू गं आय...” सुजीला कळा असह्य झालेल्या...