बौद्ध धर्मातील स्त्री विचार- लता दिलीप छत्रे

स्त्री देखील माणूस असते आणि तिलाही मानवीभावभावना असतात, त्या व्यक्त कारणाचा, स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार स्त्रीला आहे. आज भारतीय स्त्री स्वतंत्र असली तरी तिच्या मानेवरील परंपरा आणि कर्तव्य यांचा पारंपारिक जू तर आहेच सोबत स्वतःला सिध्द करण्याच नवं आव्हान देखील. यात तिची कुतरओढ होत आहे. भारतीय संस्कृतीत पाश्चात्य देशातील स्त्रीवादाच्या संकल्पना लागू होणार नाहीत. कारण इथली सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी आहे. तेंव्हा भारतीय स्त्रीला आपल्या परंपरेत राहूनच स्वतःच्या मुक्तीच्या वाट शोधता येतात का, हा विचार अग्रस्थानी ठेवून लेखिका लता छत्रे यांनी हे पुस्तक लिहीलं आहे. या पुस्तकातून आपल्या सांस्कृतिक चौकटीत राहून आपल्या मुक्तीच्या वाटा शोधता येतात का याचा धांडोळा तर घेतला आहेच परंतु ही वाट किती उदात्त होती याचीही प्रचीती या पुस्तकातून येते. आपला हा दृष्टीकोन मांडताना लेखिका लिहितात, सर्वसाधारणपणे असे दिसते की, भारतीय संस्कृतीमधील स्त्री कितीही अन्याय झाला तरी आपली सामाजिक, सांस्कृतिक तसेच कौटुंबिक चौकट मोडून किंवा या चौकटी बाहेर पडण्याचा विचार करत नाही. मग भारतीय...