Posts

गोष्ट एका सरीची!

"ये सरे, उठ. दाजी आल्यात पाणी दे त्यास्नी." "व्हय, देतुय न्हवं का?" "अगं फुकनीचे, काम कर आधी मग लाग तोंडाला. आली मोठी रागाची." "आत्ता देतु म्हणलं, तर त्यात राग कसला. काय बोलायची सोयच न्हाय हिच्यासमोर." ते दाजी वागत्यात कनाय हिच्याबर तेच बरोबर हाय. "दाजी धरा पाणी. चूळ भरताय न्हवं?" "व्हय व्हय सरे आलू थांब जरा." मी दाजीच्या हातात पाण्याचा तांब्या द्यायला हात म्होर केला. तांब्या घेता घेता दाजींनी हातबी हळूच दाबला.  बाई! काय धाडस तरी दाजीच. आक्का आत असली तरी तेस्नी भीती न्हाय वाटत. मला मातर आक्काची लय भीती वाटती. एकदा का वटवटाय लागली का तिच्या तोंडाला जरा सुदी फ्योस येत न्हाय, कसलं त्वांड हाय कुणास ठावक. पार दाजी लय जीव लावत्यात बर मला. लय म्हंजी आक्कापेक्षा बी. "सरे, दाजीस्नी ताट कर. जेवाय वाढ. मी जरा गोट्यात चक्कर टाकून येती." "बरं." मी म्हंटल. 'मला म्हाईतच व्हतं आत्ता ही जाणार आणि.... 'मी कपाटावरलं ताट घितलं आणि दाजीस्नी जेवाय वाढाय लागली. माझं ताट अज...

मातृत्व

Image
 आज आईचा दिवस. Mother's Day. आई काय असते हे ती आपल्या आयुष्यात "असते" तोपर्यंत कळत नाही.  असे जोशाने दिवस-बिवस साजरे करून आपण आपली जबाबदारी झटकतोय की आधीच जबाबदारीने वाकलेल्या तिच्या खांद्यावर अजून भार लादतोय याचा विचार होणं गरजेचं आहे. खरं तर प्रत्येक नात्याचं वय हे त्यातील गरजेवर अवलंबून असतं. गरज , स्वार्थ , ओलावा संपत आला की नाती मरायला टेकतात , पण मरत नाहीत. आपण मानुष्यप्राणी आपल्या गरजांसाठी नात्यांचं चित्र विचित्र जाळं विणतो. या जाळ्यात सर्वात जास्त गुरफटून जाते ती बाई. आईपण समजून घेण्याऐवजी त्याचं उदात्तीकरण करण्यात आपण मानलेली धन्यता कोत्यावृत्तीचं द्योतक आहे. आपण आईपणाचा उत्सव करू पाहतोय पण आईपण वाटून घेऊ पहात नाही. आई होणं ही फार व्यापक आणि सुंदर गोष्ट आहे. पण , आपण ही संकल्पना फक्त योनी , गर्भाशय आणि त्या गर्भाशयाची उत्पादकता एवढ्या त्रिसुत्रीत बंदिस्त केली. जी बाई मुल जन्माला घालू शकते तीच आई होऊ शकते आणि त्यातही जर तीने पुरूष जन्माला घातला तर ती सन्माननीय असते. मनुस्मृतीनं सांगून ठेवलंय , ' मुलगी झाली आणि कुणी विचारलंच काय झालं ? तर , काहीही झालं नाह...

साचलेल्या संवादाचं काय?

पंधरा दिवस झाले शहरात राहायला येऊन. अजून शेजार्यापाजार्यांची काहीही ओळख झालेली नाही. खरं तर कुठेही नव्या ठिकाणी रहायला गेल्या नंतर पहिल्यांदा ओळखीचे होतात ते दुकानदार! कारण गरज असते, दोघांनाही. आपल्याला आणि त्यांनाही! नव्या ठिकाणी आपुलकीने चौकशी करणारी हीच ती जमात! अजून काही लागणारे का? आपुलकीने विचारणारे... दुसरे असतात चहा टपरीवाले किंवा नाष्टा सेंटर वाले आणि तिसरे रिक्षावाले... रस्त्यावरून जाताना तेही आपुलकीने विचारतात, "कुणीकडं जायचं...? मग शेजारी पाजारी हळूहळू ओळखीचे होतात. तेही मोजकेच! पूर्वीच्या शहरात हा अनुभव आलाच आत्ताही येतोय... आणि तरीही शहराची भुरळ पडतेच! गावाकडं कसं असतं, हातात बदली घेऊन निघालं तरी लोकं विचारतात..."काय झाडायला वाटतं?" सगळी विचारपूस लागते तिथे, 'सून सकाळी किती वाजता उठते पासून म्हस लवकर पानावते कि न्हाई...' इथं पर्यंत कुठलाही विषय वर्ज्य नसतो... पण इथे आमच्या कॉलनीत एक ताई आहे, जी पहिल्या दिवसापासून मला विचारते, "निघालीस एवढ्या लवकर?" मी हो म्हंटल की, वरून टाटा, बायबाय पण करते. ती येता जाता सगळ्यांना बोलवत असते...

खेळ मांडला

Image
खेळ मांडला  दुपारच्या वेळेत मी दुकानात जाण्यासाठी बाहेर पडले. दहा रुपयाची डाळ आणायची होती संध्याकाळच्या आमटीला. दारात गोट्या गोट्यांचा डाव मांडून बसलेला. तो आणि गल्लीतलीच आणखी दोन पोरं. "का रे गोट्या शाळेत गेला नाहीस? शाळा चुकवून कसला खेळ खेळतोयस शाळेतून आल्यावर खेळायचं ना!" गोट्या तेंव्हा असेल दहा-बारा वर्षांचा. गोट्यानं  माझं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं... घरासमोरच्या पडवीत गोट्याची आई म्हशीला पाणी पाजत होती. "आगं ये कुणाला येरे जारे करतीयास गं? व्हय? दिसत न्हाय का दीर हाय तो धाकला लहानगा असला म्हून काय झालं तेला मानानं बोलवायचं ध्यानात घी नीट. व्हय त्यो शिकलेला तोरा न्हाय दावायचा हितं. हां सांगितलं न्हाय म्हणशील पुना.." मी गांगरून गेले, म्हंटल, "भावोजी, अहो शाळेत जायचं नाही का?" आत्ताही गोट्यानं ऐकून न ऐकल्यासारखंच केलं पण आत्ता जरा त्याचं नाकही फुरफुरल शेवटी त्याच्या आईनं मला झापलं होतं. मी तशीच दुकानात गेले. लाजतकाजत दहा रुपयांची डाळ मागितली. हो लाजतकाजत कारण दुकानदारांना हल्ली पाच-धा रुपयांचं गिऱ्हाईक आवडत नाहीत. ते बोलून दाखव...