मनाचं Negative detox कसं करायचं?

कल्पना करा की, तुमचं मन म्हणजे एक बाग आहे. या बागेत आनंद, आशा, उत्साह, प्रेम, कृतज्ञता, अशी विविध रंगाची फुलझाडं फुललेली असतात. पण, तुम्ही जर या बागेकडं लक्षच दिलं नाही. त्याची मशागत केली नाही, खतपाणी घातलं नाही तर काय होईल?  तर त्यात तणाव, राग, अपयश, दु:ख, चिंता, भीती, चिडचिड अशा नकारात्मक भावनांचं तण माजेल आणि तुमच्या बागेचं सौंदर्यच नाहीसं करून टाकेल.

बागेचं सौंदर्य जपण्यासाठी जसं खतपाणी आणि मशागत आवश्यक तसंच मनाचंही आहे.

दररोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी, तणावपूर्ण घटना, वाद, कामाचा अतिरिक्त ताण, कौटुंबिक कलह, ऑफिसमधील हेवेदावे, दु:खद प्रसंग या सगळ्यातून मनात नकारात्मक भावना साचत जातात. या नकारात्मक भावना ओळखून त्यांच्यावर काम केलं तरच आपल्या मनाचं सौंदर्य आणि परिणामत: आपल्या जीवनाचं सौंदर्य टिकून राहतं.

मग मनाची मशागत कशी करायची? नको असलेल्या, नकारात्मक घातक भावनांचा निचरा कसा करायचा? थोडक्यात मनाचं Negative detox कसं करायचं जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.

एकदा Negative detox केलं म्हणजे संपलं आपलं काम असं होत नाही. जसं बागेतील, शेतातील तणावर सातत्याने लक्ष ठेवावं लागतं तसंच मनावरही सातत्याने काम करावं लागतंच. अर्थात, विपरीत, तणावपूर्ण, दु:खद प्रसंगात, मनाच्या या मशागतीचा नक्कीच फायदा होतो.

तर पाहूया Negative detox च्या काही सोप्या पद्धती-

 थांबा.पाहा. पुढे जा-

traffic signal चा हा मंत्र मनासाठीही गरजेचा आहे. अनेकदा आपण विचारांच्या भरात वहात जातो. डोक्यातील विचारांचं वादळ थांबत नाही. एखादी घटना, एखादं वाक्य, अगदी रस्त्यावर पाहिलेला एखादा प्रसंग, अशा छोट्या गोष्टीनीही डोक्यातील विचार चक्र जोरात फिरायला लागतं. बरेचदा हे विचार निगेटीव्ह असतात. Nigative विचारांचं पाहिलं वैशिष्ट्य हेच की यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी सोपा नियम आहे, stop, observe, proceed.

नकारात्मक विचार येतील तेव्हा थोडं थांबा आणि एक दीर्घ श्वास घ्या. मनातील विचारातून नेमकं काय ध्वनित होतं त्याचा अंदाज घ्या. आपले विचार जितकी परिस्थिती फुलवतात तितकी परिस्थिती गंभीर किंवा वाईट नसतेही बऱ्याचदा. अशावेळी तुम्ही जे काही काम करत असाल ते थोड्या वेळासाठी थांबवा. तीन वेळा दीर्घ श्वास घ्या. इथून पुढची सर्व कामे थोड्या संथ गतीने लक्षपूर्वक करा. मध्ये मध्ये दीर्घ श्वसन करत राहा. यामुळे डोक्यातील विचारांचे चक्र थांबायला मदत होईल. परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा नक्की परिस्थिती समजून घ्यायला  मदत होईल.

शक्य तेव्हा, आठवेल तेव्हा, ही practice नक्की करून पाहा.

Ø      Social media/News channel यांच्यापासून break घ्या.

बरेचदा Social media वरील चर्चा आणि News channel वरून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमुळेही आपले मन नकारात्मक विचारांनी भरून जाते. जेव्हा खूपच उदास, निराश वाटू लागतं अशा वेळी Social media आणि News channel यांना काही दिवसांसाठी सुट्टी द्या.

याकाळात सकारात्मक राहण्यासाठी किंवा मनाची ऊर्जा परत मिळवण्यासाठी पुढील गोष्टींची मदत होऊ शकते.

विचारांचे निरीक्षण करा.

वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करा.

एका जागी बसून राहण्यापेक्षा हालचाल करा.

घराबाहेर फिरायला जा. शक्यतो शांत ठिकाणी आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ जाईल अशी जागा निवडा.

कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत गप्पा मारा.

चांगल्या पुस्तकांचं वाचन करा.

नवीन काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. ज्याचा तुमच्या करिअरसाठी उपयोग होईल.

पुरेशी आणि गाढ झोप घ्या. रात्रीचं जागरण टाळा.  

Ø      विचार आणि भावना व्यक्त करायला शिका.

नकारात्मक विचार आणि भावना जर वेळीच बाहेर पडल्या नाहीत. तर त्या आपल्या आयुष्यातील गुंतागुंत वाढवून ठेवतात. याचा शारीरक आणि मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. म्हणून, योग्य त्या वेळी आपल्याला जमेल त्या पद्धतीने या विचारांचा आणि भावनांचा निचरा करणं गरजेचं आहे.

दररोज तुम्ही जर्नल/ डायरी लिहू शकता. ज्यामध्ये तुम्ही त्या त्या दिवशी घडलेल्या घटना आणि त्यामुळे तुमच्या मनात आलेले विचार लिहून ठेवू शकाल. यामुळे तुम्हाला तुमच्या मनाची विचार करण्याची पद्धतही लक्षात येईल. आपण जेव्हा आपले विचार लिहायला घेतो तेव्हा त्यांचा वेग कमी होतो. मन शांत होतं आणि परिस्थितीचं योग्य पद्धतीने आकलन होण्यास मदत होते.

गाणी ऐका- आवडती गाणी ऐकल्यानंही मूडमध्ये बदल होतो. विचार बदलतात. भावना बदलतात.

ध्यान/meditation करा. यामुळे मन शांत होईल. डोक्यातील विचार चक्र थांबेल. हार्मोन्सचा समतोल साधला जाईल.

समजून घेणारे मित्र असतील तरच त्यांच्याशी बोला. तुम्हाला तुमच्या विरुद्धच भडकवणारे, तुम्ही कसे मानसिकदृष्ट्या कमकुवत आहात हे दाखवून देऊन हिणवणारे, थोडक्यात तुमच्या nigativityमध्ये भर घालणाऱ्या toxic लोकांशी अशा वेळी काहीही बोलायला जाऊ नका.

घराच्या लोकांशी बोला. त्यांना तुमच्या मन:स्थितीची जाणीव करून द्या.

मन उदास असेल किंवा एकाच गोष्टीवर अडकलं असेल, तर स्वतःच्या समस्या काही वेळ बाजूला ठेवा. खरोखर गरज असेल अशा लोकांसाठी तुम्ही काही मदत करू शकता का ते पाहा. इतरांना मदत केल्याने आत्मिक समाधान मिळते. परंतु ही मदत योग्य व्यक्तीला झाली पाहिजे.

आजूबाजूच्या लोकांना कशाची गरज आहे का? त्यावर तुम्ही काही काम करू शकत असाल तर ते करा. तुमच्यासारख्या समविचारी लोकांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गरजू विद्यार्थ्याचा अभ्यास घेणं, दररोज तुमच्या ऑफिस रूट वरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला लिफ्ट देणं, कुणाचं काही जरुरी समान पोहोच करणं, शक्य असेल तेव्हा अशी छोटी-मोठी मदत करायला काही हरकत नाही.

तुमच्यातील कौशल्याचा, कलेचा इतरांना काही उपयोग होणार असेल तर तसे प्रयत्न करणे, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना थोडा ब्रेक नक्की लागेल. जगणं तितकंही अवघड नाही, याची जाणीव होईल. इतर लोकांनाही आपल्या सारख्याच अडचणी असतात. एकमेकांच्या मदतीनं आपण अशा अडचणींवर मार्ग काढू शकतो, याची जाणीवही मनावरील ताण हलका करते.

हे सगळे उपाय करूनही तुमच्या मन:स्थितीत काही बदल होत नाही. पुन्हा पुन्हा काही दिवसांनी तेच feeling जाणवताहेत असं वाटत असेल तर तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घ्या. अशी मदत घेण्यात काहीच कमीपणा नाही. स्वतःला उभं करण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न तुम्हाला नक्कीच समाधान देईल.

तुम्हाला कणखर बनवेल.

मग तयार आहात ना negative detox साठी?

याशिवाय, तुमच्याकडे काही वेगळ्या क्लृप्त्या असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका.

 

 

 

 

Post a Comment

0 Comments