Posts

Showing posts from March, 2023

असुरक्षित मातृत्वाच्या व्यथित कथा..!

Image
प्रसंग – १ माझं सिझेरियन झाल्यानंतर मला एका मोठ्या हॉलसारख्या ठिकाणी ठेवलेल्या बेडवर आणून टाकलं. हो अक्षरश: ‘टाकलं’ हाच शब्दप्रयोग इथे चपखल बसतो. जसं आपण केळीची सालं डस्टबिनमध्ये टाकतो. कारण , केळ खाल्ल्यानंतर तिच्याशी आपलं काही देणं घेणं नसतं. खरं तर सुरक्षित सिझेरियन करून सीपीआरच्या त्या डॉक्टरनी एकप्रकारे उपकारच केले होते. चित्र स्रोत: गुगल खरंच इतकी विदारक, असुविधाजनक , असुरक्षित परिस्थिती आपल्याच नशिबी असावी का असा विचार करत करत अर्धवट शुद्धीत ती रात्र तशीच काढली. दुसऱ्या दिवशी भूल उतरली आणि मी पूर्ण शुद्धीत आले. स्वतःच्या परिस्थितीची फारच कीव वाटत होती. मी उठून बसण्याचा प्रयत्न केला. उठून बसल्यावर जे दिसलं ते जास्त शुद्धीवर आणणारं होतं. समोरच्या बेडवर एक पेशंट होती जिचं पहाटे-पहाटे सिझेरियन झालं होतं. दुसरी मुलगीच झाली म्हणून ती प्रचंड नाराज होती. दोन-तीन तास होत आले तरी तिनं मुलीला जवळ घेतलं नव्हतं, की तिला दूध पाजलं नव्हतं. तिच्या सासरचं कुणीही माणूस दवाखान्यात फिरकलं नव्हतं. तिच्यासोबत तिची कुणीतरी मावशी होती , ती कितीदा तिची समजूत काढत होती. मुलीला पाजण्यासाठी. भुकेनं ...

कोलाज भाग दुसरा

Image
हातातील साखळदंड रुतत होते. खरचटून मनगटाला जखमा झाल्या होत्या. एकाच ठिकाणी बंदिस्त राहून सुरुवातीला चिडचिड, नंतर अगतिकता आणि हताशता वाटू लागली, पण हळूहळू त्या बंदिस्तपणाची सवय झाली. इतकी सवय की, तिथून बाहेर पडण्याची कल्पनाही भितीदायक वाटू लागली.  एका ठिकाणीच असं किती दिवस पडून राहणार? खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या एकाच तुकड्यावर किती दिवस समाधान मानणार? हवेची ‘एकच झुळूक’ त्यात दिवसाच्या वेळेनुसार तापमानात होणारे बदल एवढं सोडलं तर आयुष्यात नाविन्य असं काहीच नाही.  बाहेर पडण्याचा विचार केला तर वाट दिसेलही. पण त्या अनोळखी वाटेचीच तर भिती वाटते. कसं असेल इथून बाहेर पडल्यावर दिसणारं जग? आणि खरंच ते ‘तो’ सांगतोय तसं असुरक्षित असेल तर... तसंही इथं बंदिस्त राहून एक दिवस मरणारच आहेस... आणि बाहेरचं जग असुरक्षित असलं तर तिथंही मरणारच आहेस... दोन्हीकडेही मृत्यू हा आहेच... पण न जाणो बाहेर पडल्यावर मरण्यापूर्वी ‘जगण्याची संधी’ मिळेल. हा दुसरा आवाज... पण हा इतका क्षीण असतो की, त्याचं ऐकावं वाटत नाही...त्यात दम असत नाही... ना जरब आणि जबरदस्ती असते... ऐकलं तर ऐक नाही तर राहूदे असा एक विचित्र अलि...

कोलाज

Image
खिडकीतून बाहेर पाहिलं तर फक्त रणरण ऊन दिसत होतं. उन्हाच्या तडाख्यानं झाडं मलूल झालेली. ते दृश्य पाहून तिचंही मन कदाचित मलूल झालं होतं. ती नव्या जगाच्या शोधात निघाली होती. पण निर्धास्त मन नव्हतं. नव्या क्षणांवरही आपल्या आधीच अपशकुनी सावल्यांनी घर केलं असावं अशी धास्ती होती. मध्येच आपल्यातील ही विषण्णता झटकून तिने दीर्घ श्वास घेतला. बाजूला बसलेल्या मुलाचा हात हातात घेऊन घट्ट दाबला आणि त्याच्यावर ओठ टेकवले. ओल्या पापण्या मिटून शांत होण्याचा प्रयत्न केला. तरीही मनातील द्वंद्व संपत नव्हतं. आतील धडधड थांबत नव्हती. मनात उठणाऱ्या प्रश्नांना ती कुठल्याच प्रकारे समाधानकारक उत्तरे देत नव्हती. होईल , बघू , अशा अर्धवट शक्यातांवर आधारलेली तिची उत्तरं तिलाच पटत नव्हती. तरीही अल्लडपणा न शोभणाऱ्या वयात तिला आणखी एक आंधळी कोशिंबीर खेळायची होती. कशासाठी ? तिलाही माहीत नव्हतं. ऊन झेलणारी झाडं बघून तिला हसू येत होतं. या झाडांच्या जागी आपण असतो तर इतकं ऊन झेलून सावली देऊ शकलो असतो का ? असा एक पोकळ अतिमानवी विचार स्पर्शून गेल्यावर तिचं तिलाच तिच्या मूर्खपणाचं हसूही आलं. रस्ता पळत होता पण थांबण्याचं न...

पुस्तकांच्या प्रेमात पडायला लावणारं पुस्तक - आडवाटेची पुस्तकं – निखिलेश चित्रे!

Image
आडवाटेची पुस्तकं – निखिलेश चित्रे Image source Google हे पुस्तक म्हणजे एका अस्सल वाचकाचा प्रवास. वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहिलेल्या या पुस्तकात चित्रे , मी का वाचतो? या प्रश्नाचं उत्तर देताना लिहितात , ‘वाचताना आणि वाचून झाल्यावर वाचकाच्या आत अनेक सूक्ष्म बदल घडत असतात.... पुस्तकं केवळ आनंदच देतात असं नाही, वेळप्रसंगी भक्कम आधारही देतात.’ आडवाटेची पुस्तकं हे पुस्तक वाचतानाही अगदी असाच अनुभव वाचकाला येतो. हे पुस्तक वाचताना पुस्तकाच्या दुनियेची एक अद्भुत सफर घडते. या पुस्तकात ज्या पुस्तकाबद्दल लिहिलंय त्यातलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही. पण , त्या पुस्तकांच्या गोष्टी, त्या लेखकांच्या गोष्टी , लेखकाचे पुस्तक अनुभव आणि ते मांडण्याची पद्धत हे सगळंच आपल्याला खिळवून ठेवतं. वाचक म्हणून आपण अजून किती बालिश आहोत , आपल्या प्रगतीला किती वाव आहे हेही कळतं. एखाद्या भव्य आकृतीपाशी येऊन स्तिमित होऊन जावं तसं हे पुस्तक वाचल्यावर होतं. हा प्रवास आपणही करून पाहू शकतो , हा आत्मविश्वास हे पुस्तक देतं. पुस्तकाच्या या आडवाटा खरोखर एकदा अनुभवायला हव्यात. यातून फिरताना नक्कीच काहीतरी वेगळं आपल्यासोबत...