सॅनीटरी पॅडमुळे कॅन्सरचा धोका? काय आहे तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.
पोटात हलक्या कळा येऊ लागतात, कंबर अवघडून जाते, खाली ओलसरपणा जाणवायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की पिरीयड आलेत. त्यानंतर पहिली आठवण होते ती, सॅनीटरी पॅडची. दर महिन्याच्या त्या दिवसात आवरून लागणारी गोष्ट म्हणजे सॅनीटरी पॅड. पण हे सॅनीटरी पॅड आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगले किंवा वाईट ठरू शकतात याचा कधी विचार केलाय का? सॅनीटरी पॅड ही आजच्या काळात एक मुलभूत गरज बनली आहे हे खरं आहे पण हीच पुढे जाऊन त्रासदायक ठरणार असेल तर? Toxic Links नावाच्या एका पर्यावरणासंबंधी काम करणाऱ्या NGO ने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील जे top sanitary pads brand आहेत त्यांच्या वापरातून पर्यावरणाला तर हानी पोहोचतेच पण, स्त्रियांच्या आरोग्यावरही याचे विपरीत परिणाम होत आहेत. यात अभ्यासामध्ये त्यांनी whisper, Stayfree, sofy, या inorganic brands चा तर Peesafe, Nua, आणि Plush या organic brands चा अभ्यास केलेला आहे. जास्तीत जास्त रक्त शोषून घेणे आणि फ्रेशनेस देण्याच्या उद्देशाने म्हणून या ब्रँड्सनी ज्या रसायनांचा वापर केलेला असतो तो आरोग्याला घातक आहे असं या अहवाल सादर करणाऱ्या डॉ. आकांक्षा मेहरोत्रा याचं म्...