Posts

Showing posts from January, 2022

झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टची डिझायनर हेड शाहीन अत्तारवालाचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल!

Image
‘इच्छा तेथे मार्ग,’ हा सुविचार तुम्ही अनेकदा ऐकला , वाचला असेल. पण , या सुविचाराचा खरा अर्थ जर तुम्हाला समजावून घ्यायचा असेल तर मायक्रोसॉफ्टची प्रोडक्ट डिझायनर असणाऱ्या शाहीन अत्तारवालाची ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे.   Image source Google मुंबईच्या झोपडपट्टीत जन्माला आलेल्या शाहीनने मायक्रोसॉफ्ट सारख्या प्रथितयश कंपनीत जे स्थान मिळवले आहे , ते अचंबित करणारे आहे.   मुंबई शहराला स्वप्ननगरी म्हटलं जातं आणि हे खरंही आहे. डोळ्यात स्वप्नं घेऊन येणाऱ्या आणि स्वप्नांसाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी असणाऱ्या लोकांना हे शहर कधीच निराश करत नाही. शाहीनच्या लहानपणी तिचे वडीलही असेच चांगल्या जीवनाची स्वप्नं डोळ्यात घेऊन मुंबईत आले होते. शाहीनचा सुरुवातीचा काळ बांद्रा रेल्वे स्टेशन शेजारच्या एका झोपडपट्टीत गेला. या झोपडपट्टीने तिला जीवनाची काळी बाजू दाखवून दिली. खूप लहान वयात तिने जीवनाचे विदारक चित्र पहिले होते. झोपडपट्टीत जिथे सार्वजनिक संडासांचीही सोय नव्हती अशा ठिकाणी जी लहानाची मोठी झाली तिने काय काय पहिले असेल अनुभवले असेल याची कल्पनाच केलेली बरी.   आजूबाजूच्या स्त्...

पुष्पा : द राईज प्रचंड आशावादी तरीही निराश करणारा चित्रपट!

Image
सध्या पुष्पा : द राईज (पार्ट १) या चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. एकूण चार भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी तर नुसता कल्ला केला आहे. पुष्पाच्या ट्रेंडींग गाण्यावर आणि डायलॉगवर रील्स बनवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नर पासून ते हार्दिक पांड्या पर्यंत सर्वांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत. यावरूनच पुष्पाच्या लोकप्रियतेने किती मोठे टोक गाठले आहे लक्षात येते.   Image source Google एक साधा लाकूड तोडणारा मजूर ते लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख असा सामान्य माणसाच्या यशाचा प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकात नाविन्यपूर्ण असे काहीच नाही. तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेण्याचे कारण म्हणजे यातील डायलॉग , मसाला, सीन , आणि गाणी.   सामाजिक वास्तव दाखवण्यात चित्रपट यशस्वी ठरला असला तरी या वास्तवातून जे सत्य अधोरेखित होते ते भ्रमनिरास करणारेच आहे. पुष्पा (अल्लू अर्जुन) हा या चित्रपटाचा नायक. जो एका वंचित घटकाचे प्रतिनिधित्व करतो. जाती-वर्गनिहाय त्...

प्रवास

Image
             “प्रवास” तो परिसर म्हणजे जणू धरतीवरील स्वर्ग असावा. सगळीकडे हिरवी , पोपटी पाने असलेली डौलदार झाडे आनंदात डुलत होती. त्यावर गुलाबी , लाल , पिवळी , आबोली अशा विविध रंगांची फुले फुललेली होती. तिथल्या वातावरणातून प्रसन्नता ओसंडून वाहत होती. पायाखाली मऊशार हिरवे , लुसलुशीत गवत पसरलेले होते. त्यावरील साचलेल्या दवाचा गारवा पायांना जाणवत होता. फुलपाखरांची लगबग जाणवत होती. वातावरणात एक हवीहवीशी शांतता होती.   फुलावर उडणाऱ्या त्या रंगीत फुलपाखराला धरण्याचा मोह अनावर झाला होता. तरीही हळूहळू चालता चालता कुठले बरे फुलपाखरू आपल्या हातात येईल याचा मी अंदाज बांधत होते. एका फुलावर मध गोळा करण्यात गुंगलेल्या फुलपाखराला मी हळूच स्पर्श केला आणि त्याला उचलून हातात घेतले. त्याला स्पर्श करताच त्या नाजूक फुलपाखराची एक मोठी अळी झाली. हाताच्या दाबाने ती आली फुटून त्यातून काळसर द्रव वाहू लागला. त्या द्रवाची भयंकर दुर्गंधी येत होती. स्वतःच्याच हाताची त्या क्षणी प्रचंड किळस वाटू लागली.   हात झटकला तरी तो काळा द्रव हट्टी मुलासारखा चिकटून राहिला...

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

Image
Image source : Google गतकाळाच्या आठवणी एखाद्या भुताप्रमाणे आपल्याला झपाटून टाकतात. हा भूतकाळ कधीकधी इतका आपल्यावर अधिकार गाजवतो की आपण त्याच्या मगरमिठीतून कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरी सुटू शकत नाही. एखादे जीवघेणे आजारपण असेल , प्रेमभंग असेल , कुणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल , एखाद्या जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात असेल , अशा घटनांनी मनावर खोल परिणाम केलेला असतो हे नाकारता येत नाही. या आघातातून सावरायचे झाल्यास स्वतःलाच प्रयत्न केले पाहिजेत. या नकारात्मक आठवणी सोडून देऊन जगणं शक्य आहे का ? असा जर प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर याचं उत्तर आहे, हो. तुमचा भूतकाळ कसाही आणि कितीही वाईट असला तरी आजही एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आपला भूतकाळ म्हणजे आपल्या आयुष्याचा एक भाग असतो , भूतकाळ म्हणजेच संपूर्ण आयुष्य नव्हे. थोड्याशा प्रयत्नाने तुम्ही या जंजाळातून नक्कीच बाहेर पडू शकता. या सहा पायऱ्या तुम्हाला तुमच्या भूतकाळाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी खूप म्हणजे खूपच फायदेशीर ठरतील.   यातील पहिली पायरी आहे , आपल्या भावनांप्रती सजग होणे – तुम्हाला जो ...