झाड (मुक्त ललित)

काळ्या कसदार, आर्द जमिनीत एक कोंब उगवला. 🌱 त्यांना वाटल ती वेल आहे, त्यांनी आधाराला एक काठी उभी केली, कोंब सांगत राहिल, मी झाड आहे म्हणुन, पण त्यांनी ऐकल नाही. त्यांनी तिला वेलच बनवल. तिने कुठल्या दिशेला वाढायच हे तेच ठरवु लागले, जरा इकडेतिकडे सरकली की तिला छाटुन सरळ करु लागले. तिला ओढ होती स्वच्छ सुर्यप्रकाशाची, पण ते तिला प्रकाशाकड झेपावु द्यायचे नाहीत. आधारान कशीबशी ती वाढु लागली, वेल आता बहरु लागली. तिच्या बहरण्याचीही त्यांना धास्ती वाटु लागली. वेल आता पुर्ण वाढली, आता ती फुलांनी बहरुन गेली. तिच्या मनात आणि भोवताली फुलपाखर रुंजी घालु लागली. मनातल्या मनात तिने पाखराशी हितगुज करण्याच स्वप्न पाहिल, स्वप्न पाहता पाहता तिचा डोळा लागला.
डोळे उघडले, आणि पाहते तर काय? तिला तिच्या जमिनीतुन, त्या उबदार कुशीतुन उपटुन, दुसर्या बागेत रुजवलेल. तिथही तो काठीचा आधार आणि चहुबाजुंनी कुंपण. आता पाखरांना ती भेटु शकत नव्हती, ती थोडी हिरमुसली. त्या नव्या अनोळखी जमिनीत तिला हरवल्या सारख वाटु लागल. ती कोमेजली, इथेही प्रकाशापासुन तिला दुरच ठेवल.
अचानक एक दिवस पाहते तर काय आता तिच्या फुलाच फळ झाल होत, ती आनंदली. छे पण त्यांनी ते फळ तोडल. आता दर वेळी हे असच होवु लागल. ती फुलायची आणि फळांवर मात्र त्यांचा हक्क. तीला वाटल ते फळांना चांगल जपत असतील कदाचित आपल्या पेक्षा जास्त. सुर्याला पाहण्यासाठी ती धडपडायची, ती थोडी जरी इकडेतिकडे सरकली की, लगेच ते तिला छाटुन टाकायचे. ती झुरझुरु लागली, मोकळ्या आकाशाला पाहण्यासाठी, छे अशक्यच होत पण ते. तीने प्रयत्न वाढवले, ती रोज झेप घ्यायची आकाशाकडे, त्या उबदार भास्कराकडे, तिथेच कदाचित आपला जीवनरस असेल, अस तिला वाटायच. ती वाढायची त्याच्याच दिशेन, ते परत छाटायचे. ती वाढायची, ते छाटायचे. बरेच दिवस हे असच सुरू राहील. सततच्या छाटण्या वाढण्याच्या संघर्षान तिला कणखर बनवल. ती आता जोमाने झेपावत होती, त्यांना आत्ता सतत छाटत राहण्याचा वैताग आला. त्यांनी शिक्का मारला, ‘हे माँड बी हाय’. त्यांनी तीला पुन्हा मुळातुन उपटुन फेकुन दिल. तिन पाहील आजुबाजूला, खडकाळ माळरान आणि वर मोकळ आभाळ. वर तिच्यासाठी जीवनरस घेऊन उभा असलेला भास्कर. तिने परत पसरली मुळ जमिनीत. आत्ता तिला आधाराची गरज नव्हती आता ती झाड होती, ‘झाड’.


Post a Comment

0 Comments