डॉन


देव आधी भावाचा भुकेला होता,
आता पैश्यांचा भुकेला झालाय.
आधी आम्ही देवाकड मागण मागायचो,
आता रोज उठून देवालाच आमच्याकडून काही तरी हव असत.
देव आधी भजनाच्या तालावर डोलायचा,
आता डीजेच्या तालावर थिरकतो.
आम्ही म्हणायचो देवा माझ रक्षण कर,
आता देवालाच सेक्युरिटी लागते.
आधी देव अहिंसेचा मार्ग दाखवी,
आता देवानच आम्हाला हातात बंदुका घ्यायाला भाग पाडलाय,
देवानच सांगितलय, हृदयात देव पहा म्हणणार्याला आणि
माझ्या बद्दल उलटसुलट बोलण्यार्याला गोळ्या घाला.
आधी देव निराकार होता, सगुण होता,
आता देव कधीही कुठेही आकार घेतो आणि गुणांचा उजेड पाडतो,
आधी देव सगळ्यांचा होता,
आता तो फक्त श्रीमंताचा आहे.
म्हणून तर देशाला हजारो कोटींचा चुना लावणारा ‘मल्ल्या’ सुखरूप निसटतो,
आणि जगण्यासाठी इवलीशी जमीन शोधणारा ‘आयलान’ बुडून मरतो.
कोंबडा, कोंबडी, बकरी आता तर, माणसांचा ही त्याला बळी लागतो.
देव आधी प्रेमळ पिता होता आपला,
आता तो जगाचा डॉन झालाय.
देवान आम्हाला घडवल,
कि आम्हीच देवाला बिघडवलं?
© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.
    सरुड

Post a Comment

0 Comments