कधी कधी


कधी कधी तू असतोस सखा,

मनाच्या तळघरा पर्यंत असतो,

तुझा वावर.

कधी कधी मात्र,

बंद करावी वाटतात,

मनाची कवाडं,

तुझ्यासाठीही.

कधी कधी,

तुझ्या मिठीत झोकून द्यावं वाटतं,

स्वतःला,

कधी कधी

किळस वाटते तुझ्या स्पर्शाचीही.

कधी कधी,

तू भासतोस जादुगार,

सभोवताल मोहवून टाकणारा,

कधी कधी,

उगाच वाटते भीती तुझ्या,

जादुई बोलण्याचीही.

कधी कधी तू हवा असतोस,

आत्ता या क्षणी घट्ट मिठीत.

कधी कधी तू नकोही असतोस,

नजरेसमोर.

कधी कधी

वाटतं,

हा अन्याय असावा तुझ्यावर,

कधी कधी वाटतं,

तूच जुलूम करतोस माझ्यावर.

कधी कधी वाटत,

डुंबावं तुझ्या नजरेत,

जाणून घ्याव्यात,

आकार उकार तुझ्या देहाचा,

अधारानी तपासावी,

तुझ्या श्वासातील लय.

बिचकत बिचकत व्यक्त होताना,

कधी तू आश्वासक वाटतोस,

तर कधी दुष्टही.

तुझ्याकडे अजूनही मी माणूस म्हणून पाहू शकत नाही.

पण का?

कारण शेवटी तू एक पुरुष आहेस.

© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.


Post a Comment

2 Comments

Unknown said…
फारच सुंदर मँडम...
Meghashree said…
धन्यवाद सर