तू नसतीस तर

बये तू नसतीस तर,
अखंड सृष्टी थिजली असती,
एकाच जागी.
न मागे, न पुढे,
एकाच बिंदूशी….
तुझ्या फाकलेल्या
मांड्यातूनच प्रसवली
सृष्टीची गती.
तुझ्याशिवाय,
सुर भासले असते बेसूर
आणि
रंग बेरंग.
कातळ उजाड
आणि
भाव बंदिस्त गजा आड
तुझ्या फाकलेल्या
मांड्यातूनच प्रसवला
सृजनाचा मोहक प्रदेश.
तुझ्याशिवाय
कोरी संस्कृतीची पाटी,
सुनीसुनी मातीची ओटी.
तुझ्याशिवाय,
नसता फुलला
कर्तृत्वाचा मळा,
काळ्या कोकिळेचा 
मखमली गळा,
कोरड्या पाषाणाला
वेदनेचा उमाळा.
आदिम कालापासून
तुझ्याच मांड्यातून
प्रसवतोय,
चैतन्याचा वारा
चिरंतन जैवधारा.
तुझ्याशिवाय,
वांझोटी समतेची क्रांती,
थिजल्या डोळ्यांना,
सपनांची भ्रांती.
काळोखाचा गळा चिरून,
भेदाची विषमुळी उपटून,
घडण्या माणुसकीची उत्क्रांती,
हे महायोनी,
तू फाकव मांड्या
 अन, घाल कळ
उगवू दे क्रांतीसुर्य,
प्रज्ञेचा उजेड वाटण्या…..!
© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.
रत्नागिरी.
  

Comments

byh said…
जळजळीत शब्दकळा
स्रिमनाचे अनवट कंगोरे व्यक्त करणारी व विद्रोहाचा संयत भाषेत उच्चार मांडणारी तसेच पुरुषसत्ताक अव्यवस्थेवर चढाई करु पाहणारी कविता..!
मेघश्री...अभिनंदन आपले.

Popular posts from this blog

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing