स्वातंत्र्य म्हणजे काय?
ती मला विचारत होती, “स्वातंत्र्य म्हणजे काय?” मी पण बावरले, असा काही प्रश्न आपल्याला कशाला कोण विचारेल? नाही का, काय सांगावं बरं, “मग मी मला आठवेल तसं सांगितलं १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला वगैरे, शाळेत असताना शिकलेलं, आत्ता थोडीच सगळं आठवतंय! पण सांगितलं, मोडकं तोडकं जमेल तसं. पण आत्ता मीही थोडी धास्तावले, काय माहित आता परत काय विचारतील ही पोर, आपल्याला कुणी शहाणं समजलं तर धास्तावायला होतं, नाही समजल तर चिडायला होतं. ती मुलं परत हसलीत, त्यांच्या कळकट चेहर्यावरच हसु खुपच चमकदार होतं पण, माझ हसणं हल्ली मलाच अस चमकदार वाटत नाही, का बरं? म्हणजे त्यांचे चेहरे कळकट मळकट आहेत म्हणुन का मला त्यांच हसु जास्त तेजस्वी वाटतंय? त्यांनी परत विचारलं काय असतं स्वातंत्र्य म्हणजे? मी परत दचकले, कशाला हवंय यांना काय असत स्वातंत्र्य ते? मग म्हणाले, म्हणजे, आपण आपल्याला हवं ते खाऊ शकतो, हवं तिथं जाऊ शकतो, जे मनात येईल ते करु शकतो. हुश्श अरे वा जमलं की मला पण, फेकायला, फाडफाड, (मी स्वतःचीच पाठ थोपटली) ती टाळ्या वाजवुन हसत होतीत, माझ्या स्वातंत्र्याच्या व्याख्येवर, परत तसच ते निरागस आणि आकर्षक हसु, मला...