ती आणि सावल्या
ती आणि सावल्या ... दुपारचं रणरण ऊन... सभोवार बघेल तिथवरचा प्रदेश उन्हानच व्यापलेला... सगळ्या धरतीला सूर्य असा भाजून काढत होता. आजूबाजूला सगळी जमीन मोकळी पडलेली. जमिनीच्या भेगा ठळक झालेल्या... आणि अशा उन्हात तो एकटाच चाललेला काही तरी विचारांच्या धगीन त्याच्या आतल्या कातळावरही लाह्या फुटत होत्या... स्वप्नांच्या लाह्या... भाजून निघालेल्या... मघाशी ती इकडच आलती, एकटीच...! कुठ दिसना कशी? शामा तिचाच विचार करत चालत होता.... चालत चालत तो बर्याच दूर आलेला. दूरवर पसरलेला माळ दिसत होता. दूर दूरवर कुणीही न्हवतं पण अजूनही ती काही नजरेला पडली नव्हती. 'कुठ गेली असलं ती? इकडच तर आली होती... रोज तर इकडच भेटती आज काय झालं?' विचार करत तो खाली नदीच्या दिशेन निघाला. तरी तिचा पत्ता नव्हता. आत्ता त्याची धडधड वाढली. अस कधी होत नाही... आणि आजच... पूर्ण नदीच्या काठापर्यंत जाऊन आला तरी ती न्हवती... आत्ता मात्र त्याला जाम भीती वाटू लागली. 'कुठ गेली आसल?' 'येताना तर दिसली आपल्याला आणि आत्ता न्हाय इ...