Posts

Showing posts from July, 2023

आई - वात्सल्यमूर्ती की न दिसणारा एक अबोल संघर्ष ?

Image
मला हे का लिहावं वाटतंय ? तर फक्त ‘हे असंही असतं,’ हे इतरांना समजावं म्हणून. मानसिक आरोग्याच्या बाबतीत मी सातत्याने लिहित आहे. कारण एक तर हा विषय मा‍झ्या आवडीचा आहेच पण, काही अत्यंत वाईट कारणांमुळे खूपच जवळचा झालेला आहे. गेल्या वर्षी मी आईपणाची दुसरी बाजू नावाचा एक लेख लिहिला होता ज्यात पोस्टपार्टम डिप्रेशनचा आई आणि बाबा दोघांवरही कसा परिणाम होतो याबद्दल लिहिलं होतं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने याच डिप्रेशनमधून आत्महत्या केल्यानंतर हा विषय चर्चेत आला. बाळंतपणानंतर स्त्रीचे मानसिक आरोग्य कितपत खालावू शकते याचे ते एक उदाहरण होते. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा अशा घटना घडतात तेव्हाच आपले डोळे उघडतात. एरवी आपल्या आजूबाजूला जेव्हा अशीच उदाहरणं दिसतात तेव्हा मात्र आपण सोयीस्करपणे डोळ्यांना झापड लावून घेतो. दुसऱ्याच्या मानसिक आजारात त्याला साथ द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच कदाचित अजून आम्हाला कळलेलं नाही आणि हे समजून घेण्याचे मार्ग सुद्धा खूप कमी आहेत. म्हणून हे होत असावं. Image source : Google आज आम्ही प्रेमचा चौदावा वाढदिवस साजरा केला. या निमि...

विषादाची आत्मकथा

Image
तिने गळफास घेतला. आता ती गेली. कायमची. तिला कणाकणानी मरताना पाहणं वेदनादायी होतं खरं. पण सुटले मी तिच्या मरणानंतर. Image source: Google  "तिनं आत्महत्या का केली?" माझ्यामुळंच. मीच कारणीभुत तिच्या जगण्याला आणि मरण्याला सुद्धा. इथं तिला असं लटकताना बघतेय. शांत वाटतंय.  सगळे प्रश्न संपले? कि नविन निर्माण झाले? का केलं मी असं?  कारण वैताग आला होता रोजची किरकिर सहन करण्याचा. दररोज उठून जगण्याचा. सहन करण्याचा, रागावण्याचा, भांडण्याचा, ऐकण्याचा, ऐकून घेण्याचा, बोलण्याचा आणि बोलून दाखवण्याचा. सगळं चक्र एकदासं संपून जावं, म्हणून केलं मी हे. जगण्याची ही भयानक बाजू मी नेहमी तिला दाखवत राहिले.  तिला आकाशात उडणारी फुलपाखरं खुणावायची तेव्हा मी तिला गांधील माशीची घरटी दाखवली आणि सांगितलं की यांचा डंख खुप दाहक असतो.  तिला पावसात भिजायला आवडायचं तेव्हा, मी दाखवला तिला पायाखलचा किचकिच चिखल. तिला खिदिखिदी हसायला आवडायचं तेव्हा मी तिला भिती घातली, असं खिदिखिदी हसणाऱ्या बाईला चार लोकं चांगलं नाही म्हणत.  तिला आरशात न्याहाळायला आवडायचं तेव्हा मी सांगितलं की ती चारचौघींपेक्षाही ख...

खुन्याचे शब्द

माझ्या हातातला चाकू फिरत होता आणि डोक्यात विचार. किती तरी वेळ गेला आणि मी भानावर आले. कांदा कापण्यासाठी म्हणून घेतलेला चाकू हतात तसाच होता. पुढ्यात ठेवलेला कांदाही तसाच.  आजुबाजुला कापल्या गेलेल्या शब्दांच्या बेवारस मढ्यांचा खच लागला होता आणि नाकात शिरणारा कुबट वास डोक्यात झिणझिण्या आणत होता. आता पुन्हा नवा विचार खुन तर केला पण या मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची ? © निर्मोही