Posts

Showing posts from January, 2021

कोरा कागज भाग-६

Image
  सरला काकू घराजवळ कधी पोहोचल्या हे त्यांचं त्यांना पण कळलं नाही. विचारांच्या तंद्रीत त्या चालतच राहिल्या. रस्ता कधी मागं गेला याचा त्यांना पत्ताही लागला नाही. घराजवळ येताच त्यांना दुरूनच काहीतरी बिघडल्याची जाणीव झाली. जाताना होतं तसं आत्ता का दिसत नाही? हा एक नवा विचार आता त्या घोळवू लागल्या. या विचाराचा धागा पकडून त्या जसजशा घराजवळ येत गेल्या तसतसं त्यांना कळालं की बहुतेक सुदीपनी काही तरी पराक्रम केला असेल किंवा सुषमाने काही तरी आगाऊपणा केला असेल त्याशिवाय इतकं पाणी रस्त्यावर येणार नाही आणि बारीक काळीराख पण उडाली होती सगळीकडे म्हणजे नक्कीच काही तरी मोठा तमाशा करून ठेवला असेल या बाईनं. एका मागून एक येणाऱ्या या असंबंध विचारांनी त्यांचे मन अस्वस्थ होत होते. दारात आल्यावर तर घरात पसरलेली शांतता त्यांना आणखीनच त्रस्त करून गेली. त्या घरात आल्या तर सुषमा आणि सुदीप खाली मान घालून बसले होते. त्यांनी दळपाचा डबा ठेवला आणि इकडे तिकडे बघू लागल्या. सुषमाने भाजीची तयारी तर सगळी करून ठेवली होती. संध्याकाळचे सात वाजायला आहे होते. त्यांना पुढच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. बाहेर ठेवलेल्या बदलीकडे त...

कोरा कागज भाग-५

Image
  एकतर सासूच्या आजारपणामुळं दिवसभर दगदग झालेली. त्यात ही चकलीची फर्माईश. आईला एवढं जीवावरचं दुखणं आलंय त्याचं लेकाला काही नाही आणि सुनेला मात्र डोस पाजायला सगळे तत्पर. अगदी आयुष्यभर एकमेकींच्या इर्ष्येवर संसार करणाऱ्या जावा पण म्हातारपणात मात्र सुनेच्या बाबतीत वागताना अगदी एक होतात. सासूला जरा आराम वाटायला लागल्यावर तिनं ही सगळी भाजणीची तयारी केली आणि लागलीच दळण घेऊन आली. आज दळण झालं तर उद्या किंवा जमल्यास रात्रीच्या जेवणानंतर लगेचच चकल्या करता आल्या असत्या. उद्याचं सुद्धा काम आज आत्ता कसं होईल याकडेच तिचं लक्ष. कधी तरी निवांत वेळ मिळेल म्हणून बिचारी होता होतील तेवढी कामं हाताबरोबर करण्याचा प्रयत्न करायची. पण, कसलं काय घरातलं काम म्हणजे हनुमानाची शेपटीच करेल तितकी वाढती पण कमी व्हायचं नाव घेत नाही. इथं आल्यावर जरा कुणाशी काय बोलणं सुरु करावं म्हंटलं तर त्यात पण, खोट. शेवंता काकू मघापासून गप्प होत्या आणि अचानकच सुरु झाल्या, “काय उपेग नाही बगा भाड्यास्नी मोठं करून. तुम्हाला सांगतो, नुसतं बायको म्होरं गोंडा घोळत्यात. ” त्यांच्या डोळ्यात उद्वेग होता जणू एकीकडे लेकाला शिव्या तर घ...

कोरा कागज भाग -४

Image
  दारातल्या बॅरेल मधल्या मगानं ती त्या आगीवर पाणी फेकू लागली. शेजारच्या सरू काकू त्यांच्या गॅलरीतून हे पाहत होत्याच. नाही तरी सुषमावर लक्ष ठेवणं हे एक त्यांचं अलिखित कर्तव्य होतं. पाणी मारता मारता तिचं तोंड पण सुरु होतंच. एकतर आधीच सकाळपास्नं घरात दंगा सुरु हाय. त्यात आता तू हे करून ठेवलास. आता काय करायचं. बघ, हे तेंच नव शर्ट जळलं. सुषमाने कशीबशी ती आग विझवली आणि आधी सुदीपला जवळ ओढून घेतलं. तिचं पूर्ण अंग कापत होतं. सुदीप पण घाबरलेला त्याला वाटलं होतं आता मम्मी मारेल. पण, तिने जवळ ओढल्यामुळे तो थोडासा तिच्या बाबत आश्वस्त झाला होता. पण, पुढच्याच क्षणी त्याला पप्पांचा चेहरा आठवला. आता हे पप्पांना कळालं तरी आपल्या दोघांचीही खैर नाही हे त्याला कळून चुकलं होतं. सुदीप शांत झालाय हे लक्षात आल्यावर सुषमाने सगळा कठडा धुवून काढला. कपडे सगळे काढले आणि एका बादलीत टाकले. सगळेच थोडेफार तरी जळालेच होते. आधीच सासूचा सकाळचा बिघडलेला अवतार आणि त्यात आता सुदीपचा हा पराक्रम. तिला फक्त एवढंच कळत होतं की आजचा दिवस काही बरा नाही. पण, तरीही तिने फार धसका वगैरे घेतला नाही. कारण, खराब दिवस कधी अचानक उगव...