Posts

Showing posts from August, 2018

अक्षर मानव - संवाद सहवास ७ (मा. कुमार केतकर)

Image
अक्षर मानव - संवाद सहवास ७ (मा. कुमार केतकर) अक्षर मानवच्या प्रत्येक संवाद सहवासातून काही न काही अक्षर ज्ञान मिळतच. म्हणूनच या कार्यक्रमासाठी  आपणही जावं, अशी अक्षरशः आग लागतेच. त्यात अगदी घरच्यासारखच संयोजन, तशीच माणसं, जीव  लावणारी, म्हणून सोबत मुलांनाही घेतलं तरी काही वावगं किंवा गैरसोयीचं वाटत नाही. या सगळ्या अक्षर मानवांना भेटण्याची अतीव ओढही असतेच. आ. ह. साळुंखे   ते कुमार केतकर असे एकूण सात संवाद सहवास अक्षर मानवने आयोजित केले. कुमार केतकरांसोबतचा सातवा संवाद सहवास नुकताच सातार्याला पार पडला. केतकर सरांनी, ते पाकिस्तानात गेले असतानाच्या काही आठवणी सांगितल्या. त्यातला एक किस्सा ऐकून माझे  डोळे अक्षरशः पाणावले. ते पाकिस्तानच्या दौर्यावर गेले असताना, तिथल्या असेम्बलीतील काही खासदार  आमदारांना त्यांनी विचारलं की, "इथल्या सामान्य माणसांच भारताबद्दल काय मत आहे?" तर ते त्याच्या कडे पाहताच राहिले आणि त्यांनी अस  उत्तर दिलं की, "काही नाही! त्यांचं काय मत असणार भारताबद्दल? त्यांना एवढा विचार करायला कुठे वेळ आह...

स्पर्श

असा झुरळासारखा रेंगाळणारा, ओंगळवाणा स्पर्शाचा अनुभव देऊ नकोस. जमलच तर बघ, गालावर ओठ रुतवून, जमिनीवर टेकलेल्या पायांवर, शरिराला समभागात, दुभंगून, रुतणारा एक सरळ, छेद देता येतो का? जिथे तुझ्यामाझ्या समरुपतेला, आसमंतही निर्धोकपणे सामावून घेईल. © मेघश्री श्रेष्ठी. ‌

आक्रंदन

Image
हसतं खेळतं होतं एक छोटसं घर, छोट्याशा घरात होतं, एक इवलं इवलं पाखरू, आई-बाबाच लाडक कोकरु, रात्रीला बाबा खेळवायचा अंगणात आणि दाखवायचा आकाशातल्या, स्वातंत्र्याच्या चांदण्या. तो गायचा गाणं, मुक्तपणे… मनमुराद स्वच्छंद जगणे….. आणि अचानक…. अचानक आकाश काळवंडुन गेल, बाबाच्या काळजाला चिंतेन घेरलं. आकाशातल्या चांदण्या आता आग ओकु लागल्या, दिवसरात्र रक्ताच्या नद्या वाहु लागल्या. कोकरू भेदरल, आई हंबरली, बाप सुरक्षेचा रस्ता शोधु लागला…. कधी धर्माधांनी चोपलं, कधी सत्तांधानी. बापाच्या काळजाला सुरूंग लागला…. होतं नव्हतं सगळं विकुन, बाप निघाला, अख्ख बिर्हाड पाठीवर घेऊन, शांतीचा आणि स्वातंत्र्याचा देश शोधायला. हातातली सारी कवडी सोपवली त्यानं स्वातंत्र्याच्या दलालाकडं आणि बाप वाट पाहु लागला प्रयाणाची स्वातंत्र्याच्या आणि शांतीच्या देशात. दलालान सोपवला एक तराफा आणि इवल्या पाखराच्या हसर्या कुटुंबाला लोटलं, अजस्त्र लाटांच्या तुफान समुद्रात बापाच्या काळजाला पून्हा सुरूंग लागला. पंखाखाली पाखरं घेऊन, तारवटलेल्या डोळ्यांनी, सुर...