Posts

Showing posts from August, 2023

Just read - must readआठवणीत चिंब करणारा पावसाआधीचा पाऊस,

Image
पावसाआधीचा पाऊस - शांता शेळके  नेमेचि येतो पावसाळा, हा सृष्टीचा नियमच. या पावसासोबत काही आठवणीही येतात. बालपणीचा पाऊस कसा सुखद असतो, हल्ली मात्र पाऊस म्हणजे अनंत कटकटींचे पाल्हाळ. एक घटना घडावी आणि त्या मागून मनात आठवणींचे तरंग उठावेत, हे ही काही नवीन नाही. शांताबाईंनी अशाच एका घटनेतून जन्मलेल्या आणि त्याच्याशी समरूप असणाऱ्या असंख्य आठवणी यातील ललित लेखांत शब्दबद्ध केल्या आहेत.  त्यांची चिंतनशील वृत्ती, कविमनाची संवेदनशीलता, सहानुभूती या लेखातून प्रकट होतेच पण, एखाद्या घटनेनंतर मनाचा प्रवास कसा होत जातो तेही इथं दिसतं. त्यात हा प्रवास तर कवी मनाचा. यात घटना आणि आठवणींचा बंध उलगडताना त्यातील अनेक छुप्या कंगोऱ्यांचे सखोल दर्शन घडते.  सोपी, रसाळ आणि मनाचा ठाव घेणारी भाषा. त्यामुळे वाचनाची सहज तंद्री लागते. वाचताना अनेकदा वाटतं, आपणही हे अनुभवलंय, पाहिलंय किंवा अनुभवत आहोत. खरं तर प्रत्येक लिखाणात आपल्या भावभानांशी साधर्म्य असलेलं काही ना काही सापडतंच. तसं ते इथंही जाणवतं.  आजुबाजुला घडणाऱ्या घटनांचे सखोल निरीक्षण, जीवनाबद्दलचे कुतूहल, गुढ, अज्ञात गोष्टींची ओढ, हुरहूर, घ...

Just Read - Must Read डिप्रेशन - नैराश्यासारख्या गंभीर आजाराची खोली आणि व्याप्ती समजावून देणारं पुस्तक

Image
सध्याच्या काळात सर्वच पातळ्यांवर जाणवणारी एक भीषण समस्या म्हणजे मनोविकार. त्यातही नैराश्य ( Depression) चं प्रमाण खूप जास्त आहे. एकूण लोकसंख्येपैकी किमान 10% लोकांना तरी या समस्येनं ग्रासलेलं आहे, पण याची तीव्रता अजूनही म्हणावी तशी लक्षात आलेली नाही. अलीकडच्या काळात याचं प्रमाण वाढलं असलं तरी, हा आजार काही नवा नाही. मग याची कारणं काय असू शकतात , याची लक्षणं काय असू शकतात आणि हा आजार केव्हापासून मानवासोबत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर , प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी लिहिलेलं डिप्रेशन (नैराश्य) हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. Image source - vachan.com नैराश्य म्हणजे काय , त्याची लक्षणं काय , त्याची सुरुवात कशी होते आणि यावर आजवर कोणकोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यांचा विकास कसा झाला, या सगळ्याची सखोल आणि उत्तम माहिती या पुस्तकात दिली आहे. बरेचदा आपल्याला नैराश्य म्हणजे काय? ते कसं असतं आणि ज्या व्यक्तीला या विकारानं घेरलंय त्याची अवस्था कशी असते हेच कळत नाही. ‘काही नाही सगळे मनाचे खेळ आहेत,’ असं म्हणून आपण एखाद्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला आण...