आरोग्याला हितकारक असे हे चहाचे प्रकार कधी ट्राय केले आहेत का?
पावसाळा सुरु झाला आहे आणि अशा या थंड मौसमात जास्त आठवण येते ती म्हणजे चहाची. पावसाळ्यात पिला जाणारा हा चहा थोडा आयुर्वेदिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा असेल तर मग काय मज्जाच! पावसाचा हा ऋतू हवाहवासा असला तरी या ऋतूमध्ये पावसासोबतच काही आजारही आपला पिच्छा पुरवतात. या दिवसात सर्दी, ताप, पडसे अशा किरकोळ आजारासोबतच मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे काही गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते. या दिवसात रोगप्रतिकार शक्ती चांगली राहावी विशेषत: सर्दी/पडसे/खोकला अशा किरकोळ आजारापासून सुटका मिळावी म्हणून आम्ही इथे चहाचे काही खास प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ज्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही सुधारेल आणि मूडही! lokmat.com १)तुळस-आले चहा ( Ginger-basil leaves tea/tulas-aale chaha) – एका भांड्यात तीन कप पाणी घ्या. त्यात एक चमचा खिसलेले आले टाका. त्यानंतर १०-१२ तुळशीची पाने टाका. ५ मिनिटासाठी हे मिश्रण उकळा. उकळून झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या. आता त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि चहा सर्व्ह करा. चहाला थोडी गोडी येण्यासाठी एक चमचा मध देखील मिसळू शकता. हा चहा तुमची पचनशक्ती सुधारण्यात म...