Posts

Showing posts from July, 2021

मूड बदलण्यासाठीचा हुकमी मंत्र!

Image
from google कधीकधी अचानकच आपल्याला उदास, निराश वाटू लागते. कामात लक्ष लागत नाही. थोड्याशा कामानेही थकवा जाणवतो अशावेळी आपल्या मनाला थोड्या अतिरिक्त उर्जेची गरज असते. आपला डाऊन झालेला मूड थोड्याशा प्रयत्नाने पुन्हा अप करू शकतो. यासाठी गरज असते स्वतःच्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याची. दररोज सकाळी काही सकारात्मक वाक्यांची आठवण आपल्या मनाला करून दिल्यास उदासीचे हे ढग पटकन हटण्यास मदत होईल. नकारात्मक विचारांची गर्दी कमी होऊन आपल्या कामातील एकाग्रता वाढेल. मनाचा समतोल साधायाचा असेल तर, मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य पुरवणे खूपच गरजेचे आहे. ज्यामुळे तणावाच्या काळात ही आपले मन लगेच थकणार नाही किंवा हरणार नाही. मनाला सकारात्मक विचारांची सवय कशी लावायची याची क्लृप्ती शिकून घेतलीत तर तुम्ही कधीच नैराश्याच्या ताणतणावाच्या आहारी जाणार नाही. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार तर येतच राहतात पण, तुमच्या मनाला तुम्ही सकारात्मक विचारांवर ठाम रहायची सवय लावलेली असल्यामुळे कुठल्याही वळणावर तुमच्या मनाचा तोल ढळणार नाही हे मात्र निश्चित. मनाला सकारात्मक विचारांची सवय लावणे ही काही फार मोठी अवघड गोष्ट ना...

भारतातील पहिली महिला डॉक्टर आणि स्त्री सबलीकरणाचे आदर्श उदाहरण : कादंबिनी गांगुली

Image
आजचे गुगलच्या होमपेज वरचे डूडल तुम्ही पहिलेच असेल. आज भारतातील पहिली महिला डॉक्टर आणि पहिली महिला पदवीधर कादंबिनी बोस यांची १६० वी जयंती आहे.  आजच्या काळातही जिथे बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण धोक्यात आले आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीने या समस्येमध्ये आणखी जास्त भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे, तिथे १९ व्या शतकात कादंबिनी गांगुली यांनी स्त्री शिक्षणाचा हट्ट धरला. स्वतः पदवी घेतली आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन स्वतःचा खाजगी दवाखानाही चालवून दाखवला. १९ व्या शतकातील रूढी परंपराचा कर्मठ विरोध झुगारून आत्मोन्नती आणि स्त्री उद्धाराची अवघड वाट चोखाळणाऱ्या कादंबिनी गांगुली यांचा जीवनप्रवास आवर्जून वाचायला हवा.  Image source : Google image त्याकाळातील कादंबिनी गांगुली यांचे हे यश पाहून डोळे दिपून जातात. नव्या आणि स्वातंत्र भारतातील स्त्री कशी असेल याचे एक आदर्श उदाहरण कादंबिनी यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिले. कादंबिनी गांगुली यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते कादंबिनी बासू. ब्राह्मो समाजाचे कार्यकर्ते आणि स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते द्वारकानाथ गांगुली यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्...