Posts

Showing posts from October, 2020

संवाद आत आणि बाहेर

Image
  कुठल्याशा अबोध जाणीवा का छळत असतील आपल्याला नेहमी? कोणी असेल कुठे अस्वस्थ त्याचा आपल्याशी काय संबंध? तसाही हरेक क्षण कोणी एकच भावना जगत नाही. मग आपण कुणाच्या तरी एकाच क्षणाला कस काय त्याचं संपूर्ण आयुष्य समजू शकतो? शिता वरून भाताची परीक्षा होते, तशी एका क्षणावरून कुणाच्या आयुष्याची परीक्षा होऊ शकत नाही. जिथ स्वतःला मुक्त व्हावंस वाटतं. तिथ कदाचित दुसऱ्या कोणाच्या तरी मुक्तीची बीजं पेरलेली असू शकतात. : त्याला नक्कीच वाटत होतं आपण पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलोय. तो बोललाही तिला तसं.... तिलाही आवडतो आपण असंही वाटलं त्याला.... तिच्या मंद स्मित हास्यानं जरी भुरळ घातली असली त्याच्या मनावर तरी.... हे असे खूप काही 'पण' आणि 'तरी' ..... दोघांच्या मध्ये उभे होते.... : प्रेम.... का केलं आपण? ती सतत एकच प्रश्न विचारून छळत असते. केलं की झालं? झालं की होतं? अर्थांची शब्दाशी पाठशिवणी नेहमी चालूच असते. त्यांचा हा खेळ कधी गंमतीदार वाटतो कधी क्रूर वाटतो. कधी वाटतं हा खेळ यांचा नाही आपलाच चाललाय... पण आणि तरीही तो आवडतो आतून... खूप आतून... त्याने दरवाजे बंद केलेत, त्याच्या ...

तू नाहीस फक्त राजकुमार स्वप्नातला

Image
    तू नाहीस फक्त राजकुमार स्वप्नातला... काळजात जपलेल्या निश्चल भावनांचा तू मूर्तिमंत देह आहेस. खोलवर दडपूनही जो   कधीच गारद होत नाही, तो, माझाच अस्पष्ट हुंकार आहेस तुला लपेटून अंत होतो साऱ्या वेदनांचा. तूझ्यातच सामावलेत, माझ्या स्वप्नांचे बिलोरी मनोरे, ज्याच्या भग्न खुणा मी जपत असते जीवापल्याड. आठवणींच्या उधाणलेल्या अजस्त्र लाटांनी चिंब होतात जाणीवा-नेणीवा. माझ्या कातर क्षणांना अलिप्ततेने   दृष्टीआड करणारा करुणेचा सागर आहेस. तरीही पुन्हा पुन्हा होत असेल मोह तुलाच साद घालण्याचा तर, नक्कीच तू माझ्याच आत्मतेजाचा   प्रखर स्त्रोत आहेस. © मेघश्री श्रेष्ठी. सौ. गुगल.  

ती आणि तिचे स्थान...

Image
  आजूबाजूंच्या महिलांच्या आयुष्यावर एक नजर टाकली की आज २१व्या शतकात महिलांचे समाजात काय स्थान आहे हे स्पष्ट होते. यासाठी आजूबाजूची काही उदाहरणे मांडणे मला आवश्यक वाटते. माझ्या शेजारी राहणारी प्रिया (नाव बदललं काय नाही बदललं काय कुणाचं नशीब तर आपल्या लिहिण्याने बदलणार नाही). तर ही प्रिया तिशीच्या आसपासची. जेमतेम दहावी पर्यंतच शिक्षण. नवरा चांगला कमावता आहे. पण, कामानिमित्त दहा-पंधरा दिवस बाहेरच असतो. तो घरी आला की प्रियाचा उत्साह ओसंडून वाहतो. तो घरी असेल तोच दिवस तिच्यासाठी सणावाराचा. पण, प्रियाचा संसार वरवर असा गोंडस दिसत असला तरी, आतून ती खूपच सैरभैर असते. तिचे डोळे सदा न कदा पाण्याने डबडबलेले आणि जरा बोलू लागली की आवाज कापरा होतो. कदाचित तिच्या मनात जे आहे, ते बाहेर आणण्यास जणू कुणी तरी कडक बंदी घातली असावी. प्रियाला एक मुलगाही आहे. तिसरीत शिकतो. घरी बहुतांश वेळा प्रियाची सासू, प्रिया आणि तो नऊ वर्षांचा मुलगा तिघेच असतात. प्रियाचा नवरा सुधीर, पंधरा-आठ दिवसातून आला तरी, तो नेहमी फोन आणि पुढच्या कामाचे मिटींग्ज यातच बिझी असतो. कधी तिला बाहेर फिरायला नेलंय, कधी तिला वेळ दिलाय अस का...