Posts

पोकळी, खरी आणि खोटी!

  हे खरं खुरं स्वप्न आहे.  अर्ध्या तासापूर्वी अंथरुणातून उठण्यापूर्वी या देहाने बंद डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न. मला खरच कळत नाही मी स्वप्नात आहे का? पण, हो मी स्वप्नातच होते. एकाच वेळी भय, कुतूहल, ओढ आणि प्रीती जागवणाऱ्या अद्भुत दुनियेचा हा अनुभव आहे.  मी एका मैत्रिणीच्या घरी  आहे.  तिचं घर म्हणजे एक भला मोठा जुना वाडा. त्या वाड्यातील खोल्यांचे छत इतके उंच होते की, आजच्या काळात मधल्या भागात एक स्लॅब टाकला असता तर आणखी एक मजला तयार झाला असता. पण, दुमजली वाटावा अशा उंचीचा तो वाडा एक मजलीच होता. मैत्रिणीच्या घरी तिच्या तीन बहिणी आहेत. त्यांचे चेहरे कधी स्पष्ट दिसतात कधी अस्पष्ट दिसतात. त्यांचे चेहरे कधी ओळखीचे वाटतात तर कधी अनोळखी. त्या फक्त हसतात खिदळतात पण, काय बोलताहेत ते ऐकू येत नाही. माझी मैत्रीण त्यांच्या हसण्या-खिदळण्याला दाद देत तीही त्यांच्यात सामील होतेय. समोर जे काही अनाकलनीय सुरु आहे, त्याकडे मी फक्त शून्य नजरेने पाहत आहे. मी ही आतून हसण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतंय खूप दिवस झालेत मी यांच्याकडे येऊन आणि आता त्या माझा पाहुणचार करून थकून गेल्यात. त्य...