Posts

खेळ मांडला

Image
खेळ मांडला  दुपारच्या वेळेत मी दुकानात जाण्यासाठी बाहेर पडले. दहा रुपयाची डाळ आणायची होती संध्याकाळच्या आमटीला. दारात गोट्या गोट्यांचा डाव मांडून बसलेला. तो आणि गल्लीतलीच आणखी दोन पोरं. "का रे गोट्या शाळेत गेला नाहीस? शाळा चुकवून कसला खेळ खेळतोयस शाळेतून आल्यावर खेळायचं ना!" गोट्या तेंव्हा असेल दहा-बारा वर्षांचा. गोट्यानं  माझं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं... घरासमोरच्या पडवीत गोट्याची आई म्हशीला पाणी पाजत होती. "आगं ये कुणाला येरे जारे करतीयास गं? व्हय? दिसत न्हाय का दीर हाय तो धाकला लहानगा असला म्हून काय झालं तेला मानानं बोलवायचं ध्यानात घी नीट. व्हय त्यो शिकलेला तोरा न्हाय दावायचा हितं. हां सांगितलं न्हाय म्हणशील पुना.." मी गांगरून गेले, म्हंटल, "भावोजी, अहो शाळेत जायचं नाही का?" आत्ताही गोट्यानं ऐकून न ऐकल्यासारखंच केलं पण आत्ता जरा त्याचं नाकही फुरफुरल शेवटी त्याच्या आईनं मला झापलं होतं. मी तशीच दुकानात गेले. लाजतकाजत दहा रुपयांची डाळ मागितली. हो लाजतकाजत कारण दुकानदारांना हल्ली पाच-धा रुपयांचं गिऱ्हाईक आवडत नाहीत. ते बोलून दाखव...