निराश मानसिकता असणाऱ्या जोडीदाराशी कसं जुळवून घ्यायचं?
असं म्हणतात की , लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण बरेचदा नवरा-बायकोचा स्वभाव हा नेमका उलटा निघतो असं का बरं ? हा प्रश्न तर अनेकांना सतावत असेल. पती-पत्नीच्या स्वभावात अंतर का असतं ? याचं उत्तर तर काही देता येणार नाही, पण स्वभाव वेगळे असले तरी , एकमेकांसोबत adjust कसं करायचं हे मात्र आम्ही सांगू शकतो. जोडीदार जर नकारात्मक आणि निरुत्साही असेल तर , अशा जोडीदाराशी कसं पटवून घ्यायचं ? काही लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असतो, तर काही लोकं नेहमीच निराश मानसिक अवस्थेत असतात. अशा लोकांसोबत राहताना , अनेकदा उत्साही, आनंदी व्यक्तीची घुसमट होऊ शकते. कारण , अर्थातच स्वभाव भिन्नता! असं असलं तरी , काही छोट्या-छोट्या युक्त्या वापरून तुम्ही आनंदी राहू शकता आणि जोडीदारालाही समजून घेऊ शकता. जोडीदार नकारात्मक किंवा निराश मानसिकतेत जगणारा आहे , म्हणून तुम्हीही तोच दृष्टीकोन स्वीकारू नका. स्वतःच्या गरजा , स्वतःचा आनंद यासाठी जोडीदारावर अवलंबून राहणे सोडा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ द्या. तुमचा आहार , शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे , ही जबाबदारी तु...