दोन दिसांची नाती

आयुष्यात अनेक प्रकारच्या नात्यांनी आपण जखडलेले असतो. मनुष्य जन्म घेण्यापूर्वीच त्याची नाती जन्माला येतात. बाळ जन्म घेण्यापूर्वीच त्याचं प्रत्येक व्यक्तीशी असणारं नातं जन्म घेतं. आजी-आजोबा आतुरतेनं आपल्या नातवाची वाट पाहत असतात. त्याला खेळवण्याची , त्याच्याशी बोबडे बोल बोलण्याची अतूट इच्छा तीव्र झालेली असते ; आणि एका नव्या जगात प्रवेश करत ते बाळ आपल्या ठरलेल्या भूमिका वठवायला आलेलं असतं. कुणाचा नातू म्हणून , कुणाचा मुलगा म्हणून ; तर कुणाचा भाचा , पुतण्या म्हणून. ही नाती रक्ताची असतात , प्रेमाची असतात , विश्वास मैत्री आणि स्नेहपूर्ण असतात. विश्वासाच्या रेशीमधाग्यांनी घट्ट बांधलेली असतात. दिन जीवांचा स्नेह एकमेकांशी विश्वासाने बांधला जातो. असा स्नेहबंध म्हणजे नाती. रक्ताच्या नात्याप्रमाणे काही मानलेली नाती असतात. मनानं जुळलेली , जवळ आणणारी ही नाती आयुष्यात खूप वेळा जोडण्याची संधी आपल्याला मिळत राहते; पण ती टिकवणं, योग्य जबाबदारीनंनिभावून नेणं खूप अवघड असतं. मैत्री , प्रेम , विश्वास , आस्था , सहानुभूती यांनी ओतप्रोत भरलेली नाती कधी संपत नसतात ; आणि संपलीच तर त्यासारखी दुर...