कंटाळा आला आहे, मृतदेहांची संख्या मोजण्याचा... भयाण निराशेची चाहूल?
कोरोनाने आपलं सगळं जगणंच बदलून टाकलं आहे. सगळ्याचंच आयुष्य तणावयुक्त बनलं आहे. अशावेळी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योध्यांची मानसिकता कशी असेल याची आपल्याला कल्पनाही करवणार नाही. जिकडे तिकडे फक्त मृतदेह दिसत होते तेव्हा कित्येक डॉक्टरांनी आपली हतबलता सोशल मिडीयावरून व्यक्त केली होती. Image source : Google वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक घटना नुकतीच लखनौ जवळील कानपूर येथे घडली आहे. कानपूरच्या एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात फॉरेन्सिक प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या इसमाने आपल्या पत्नीसह दोन छोट्या मुलांचा निर्घुण खून केला आहे. त्याने लिहिलेल्या डायरीतील नोंदीनुसार ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या भीतीतून त्याने हे कृत्य केल्याचे समजते. कानपूरच्या कल्याणपूर परिसरात राहणारा हा प्राध्यापक शहरातील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कम करत होता. आधी त्याने आपल्या पत्नीचा खून केला त्यानंतर हातोडीने आपल्या मुलाचे आणि मुलीचे डोके फोडून टाकले. तिन्ही खून करताच त्याने भावाला व्हाट्सअपवरून मेसेज करून या कृत्याची माहिती दिली. या मे...