आज राष्ट्रीय विज्ञान दिवस!

दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. यावर्षी देखील आजच्या दिवसात देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा होत आहे. भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सी. व्ही. रमन यांनी भौतिकशास्त्रात लावलेल्या रमन इफेक्टच्या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिकाने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा भौतिक शास्त्रातील या अतुलनीय योगदानासाठी १९३० मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. विज्ञान क्षेत्रातील नोबेल मिळवणारे सी. व्ही. रमन हे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत. जेव्हा प्रकाश किरण कोणत्याही पारदर्शक वस्तू मधून (स्थायू, द्रव, वायू) आरपार जातात तेव्हा काही परावर्तीत प्रकाश किरणांची तरंगलांबी आणि त्यांचे आकारमान ( amplitude) बदलते. ज्या माध्यमातून हे प्रकाश किरण परावर्तीत होतात त्या माध्यमातील अणूमुळे या प्रकाश किरणातील उर्जा कण जास्त प्रमाणात पसरतात. हाच तो सिद्धांत ज्याला विज्ञानात रमन इफेक्ट (रमन प्रभाव) म्हटले गेले. सी. व्ही. रमन यांनी आजच्याचदव दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी १९२८ रोजी हा...