Posts

Showing posts from September, 2019

गोष्ट एका सरीची!

"ये सरे, उठ. दाजी आल्यात पाणी दे त्यास्नी." "व्हय, देतुय न्हवं का?" "अगं फुकनीचे, काम कर आधी मग लाग तोंडाला. आली मोठी रागाची." "आत्ता देतु म्हणलं, तर त्यात राग कसला. काय बोलायची सोयच न्हाय हिच्यासमोर." ते दाजी वागत्यात कनाय हिच्याबर तेच बरोबर हाय. "दाजी धरा पाणी. चूळ भरताय न्हवं?" "व्हय व्हय सरे आलू थांब जरा." मी दाजीच्या हातात पाण्याचा तांब्या द्यायला हात म्होर केला. तांब्या घेता घेता दाजींनी हातबी हळूच दाबला.  बाई! काय धाडस तरी दाजीच. आक्का आत असली तरी तेस्नी भीती न्हाय वाटत. मला मातर आक्काची लय भीती वाटती. एकदा का वटवटाय लागली का तिच्या तोंडाला जरा सुदी फ्योस येत न्हाय, कसलं त्वांड हाय कुणास ठावक. पार दाजी लय जीव लावत्यात बर मला. लय म्हंजी आक्कापेक्षा बी. "सरे, दाजीस्नी ताट कर. जेवाय वाढ. मी जरा गोट्यात चक्कर टाकून येती." "बरं." मी म्हंटल. 'मला म्हाईतच व्हतं आत्ता ही जाणार आणि.... 'मी कपाटावरलं ताट घितलं आणि दाजीस्नी जेवाय वाढाय लागली. माझं ताट अज...