दिव्य न्याय
हुश्श आवरलं एकदाच.... सकाळ पासून मर मर कामं करावी तेंव्हा कुठे थोडा दुपारचा विसावा... नवऱ्याची ड्यूटी साडे सातची, पोराची शाळा साडे आठ, धाकट्या लेकाची साडे नौवाची...! एकएकाचं सगळ आवरून द्यायचं. कुणाचा रुमाल सापडत नसतो, कुणाची पाणी बॉटल, कुणाची पेन्सिल रबर... सगळ्या शोधाशोधीत कमरेची पुरती.... वाट लागते... हे ऐकायला मात्र कुणाला वेळ नाही... असो.. १२ वाजले... म्हणजे अजून धाकट्याला यायला एक तसं आहे... राहिलेला कोट थोडा तरी विणून होईल.... लोकरीची गुंडाळी ठेवलेली... भली मोठी कॅरी बॅग काढली. विणलेला तुकडा बाहेर काढून दोरा बोटाला गुंडाळला आणि सुरु झाल एक सुरी विणकाम... नवी स्टार डिझाईन चांगली जमत होती.. एक ओळ कशीबशी पूर्ण झाली... तोवर दारावर थपथप ऐकू आली... दरवाजा उघडला... पोस्टमन होते.. त्यांनी एक लखोटा माझ्या हातात दिला आणि ते गेले... मी तो लखोटा तसाच ठेवला बाजूला आणि पुन्हा माझं एकसुरी विनण सुरु.. थोड्या वेळानी गाडीच जोर जोरात हॉर्न वजला.. बाळाच्या स्कूल बसचाच हॉर्न असणार... हो तोच होता त्याला घेऊन मी घरात आले... मग काय दोरा लडीला गुंडाळून पिशवी परत टाकली कोपर्यात... आ...