‘आबाळ’
“कुठलं काय वृत्तीच नालायक बाईची. जातीवंताची आस्ती तर कसं पण दिवस काढलं असतं.” “नशीब बाई एकेकाच, तिला तर काय लेकरं नको झाली आसतीली? एवढी देखणी पोरं! नवसानं पन हुईनाती एकेकाला आणि या भाड्याचं नशीब बघ की.” “लेकराकडनी बगुन तर एकादीन दिस काडलं आस्त.” “तिला आठवण येत नसल व्हय गं! माझी कशी आसतीली?, काय खात आसतीली?, कोण बगत आसल!” “येवडा ईचार हाय आन् मग आसं करतं व्हय माणुस? चैनी कराय सोकावल्याली, तिला काय पडलय मागच्यांच?” “तस न्हवं, मला आपलं वाटत गं, कुट आसल तितनं यावं आपली पोरबाळं हायती म्हणुन. त्या तर भाड्यांच नशीब उघडल.” “आन परत आली तर तसलीला घ्यायची व्हय घरात? कुटं हाय-नाय पत्या नाय, कुणा बरुबर त्वॉंड काळ केलं माहित नाय, तसलीला कोन घिल परत!” “आणि परत आली तर त्यो काय र्हायचाय का सरळा तिच्या बरबर, मागं तस पुढं व्हायचं.” “पन कुट गेली आसल ती?” “ती गेल्ती आधी आईकड. मग तिथं पन शेजारीपाजारी इचाराय लागल्यावर आईन लांब घालवली कुट आन् कामबी मिळवुन दिलं.” “मग कुट व्हती तितं तर सरळ र्हायाच नाय का!” “तस आस्तय व्हय कुटं. एकटी बाय म्हणजे इस्तु न्हवका. कोन जगु देतय बाई! खर्याची...